एमएससीआयटी च्या विद्यार्थ्यांना निंबूपाणी पाऊच वाटप.
आला उन्हाळा तब्येत सांभाळ.
प्रतिनिधी.अज़मत पठान.
जिंतूर शहरातील श्री कॉम्प्युटर व संस्कृती अल्पसंख्याक सेवा भावी संस्थे मार्फत उन्हाची तीव्रता लक्षात घेता "आला उन्हाळा तब्येत सांभाळ" या संदेशा अंतर्गत एमएससीआयटीच्या विध्यार्थ्यांना मोफत निंबूपाणी पाउच चे वाटप जिल्हा समन्वयक किशोर आव्हाळे,संतोष चौधरी, शेख सिराज जिंतूरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.के.सी.एल. चे जिल्हा समन्वयक किशोर आव्हाळे,शेख सिराज जिंतूरकर, संतोष चौधरी हे होते.या वेळी किशोर आव्हाळे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हामुळें उष्माघाता सारखे आजार होण्याची भीती असते त्यामुळे आपण आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे गरजेचे आहे.या वेळी 150 विध्यार्थ्यांना निंबूपाणी पाऊच चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी समाधान पाजई,गजानन डाके, कडुजी राऊत आदीनी सहकार्य केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें