शिक्षकांच्या दोन गटात हाणामारी दोन जण जखमीसंस्थाचालकांवरही गुन्हा दाखल. सेलूतील पहिलीच घटना.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 8 अप्रैल 2018

शिक्षकांच्या दोन गटात हाणामारी दोन जण जखमीसंस्थाचालकांवरही गुन्हा दाखल. सेलूतील पहिलीच घटना..

शिक्षकांच्या दोन गटात  हाणामारी दोन जण जखमी.

◾आरोपीत संस्था चालक डाॅ. संजय लोंढे यांचा समावेश

◾दोन्ही गटातील ६ जणांना आटक ;संस्थाचालक डाॅ. लोंढे सह अन्य आरोपी फरार.

◾दोन शिक्षकांच्या झालेल्या भांडनाने शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ.

◾संस्थाचालकांवरही गुन्हा दाखल. सेलूतील पहिलीच घटना.


समशेर खान.
सेलू:प्रतिनिधी
सेलु येथील श्रीराम कॉलनी मधील विद्यानिकेतन प्रशाळेत कार्यरत असलेल्या दोन शिक्षकांमध्ये वाद होऊन या वादाचे पर्यावसान  हाणामारीत  झाले. या घटनेत दोन जण जखमी झाले असून पोलीसांनी  दोन्ही गटातील ६ जणांना अटक केली असून संस्था चालक डाॅ. संजय लोंढे सह अन्य आरोपी फरारआहेत. हि घटना ७एप्रिल रोजी घडली असून गुन्हा रात्री उशिरा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आलीआहे. याबाबतची माहिती याप्रमाणे  ७ एप्रिल रोजी शिक्षक व संस्था चालकात भांडणे झाल्या नंतर परस्पर विरोधी गुन्हे  सेलू पोलीस ठाण्यात  दाखल करण्यात आहेत.
 शनिवारी रोजी सकाळी ११:३० वाजता  नूतन महाविद्यालय  कॉलेजच्या समोरील मैदानात विद्यानिकेतन शाळेतील शिक्षक गजानन ढाकरे व विजय टेकाळे यांच्या गटात वाद होऊन त्यानंतर  हाणामारी झाली. याप्रकरणी  गजानन रामराव ढाकरे यांनी सेलू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये घटनेच्या दिवशी   सकाळी ११:३० वाजता. नूतन महाविद्यालय कॉलेजच्या समोर असलेल्या  मैदानावर  विजय टेकाळे , श्याम टेकाळे ,राजेभाऊ क-हाळे यांच्यसह इतर पाच जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून घातक शस्त्रासह मारहाण करून  जातीवाचक शिवीगाळ केली .तसेच जीवे मारण्याची धमकी दिली यामुळे वरील आरोपी विरोधात अनुसुचित जाती प्रतिबंधक कायदा कलम ३(१)व कलम१४३,१४७,१४८,३२४,५०६,१३५   अन्वये ७ एप्रील रोजी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यातआला  आहे. या घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी रेणुका वागळे या करीत आहेत.
तर या घटनेतील दुसरे फिर्यादी विजय शिवाजीराव टेकाळे यांनी सेलु पोलीस ठाण्यात दिलेल्या  फिर्यादी मध्ये शाळा सुटल्यानंतर याच ठिकाणी व याच वेळेला  घरी जात असताना नुतन   महाविद्यालय काँलेच्या मैदानवर  गजानन ढाकरे ,व त्यांचे चुलत भाऊ ,शिक्षक डाखोरे ,घोगरे ,कपाटे ,व विद्यानिकेतन चे संस्थाध्यक्ष डॉ संजय लोंढे यांनी  गैरकायद्याची मंडळी जमवून माझी  मोटारसायकल अडवली व तू आमच्यावर कोर्टात केलेली केस परत घे या कारणावरून माझे डोके फोडून मारहाण केली  व जीवे मारण्याची धमकी दिली म्हणुन वरील या आरोपीविरुद्ध  कलम३४१,१४३,१४७,१४८,३२४,३२३,५०४,५०६,१३५  अन्वये  सेलू पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यातआला  आहे .या घटनेचा  तपास बीट जमादार यु . के .लाड  हे करत आहेत. दरम्यान सेलू पोलीसांनी  दोन्ही गटांच्या  ६ आरोपींना अटक केली असून संस्था चालक डाॅ. संजय लोंढे सह अन्यआरोपी फरार असून अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे याप्रमाणे गजानान रामराव ढाकरे,राजाभाऊ आश्रोबा डाखोरे,मताजी  श्यामराव ढाकरे,मारोती सिताराम कपाटे,दत्तराव बळीराम घोगरे,विजय शिवाजीराव टेकाळे यांना पोलीसांनी अटक केली आहे. या एकाच शाळेतील दोन्ही शिक्षक व संस्था चालक यांच्यात झालेल्या भांडनामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें