बलात्काराच्या घटनाच्या विरोधात मानवत येथे कँडल मार्च. आरोपिंना फाशीच्या शिक्षा करण्यांची मागणी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 18 अप्रैल 2018

बलात्काराच्या घटनाच्या विरोधात मानवत येथे कँडल मार्च. आरोपिंना फाशीच्या शिक्षा करण्यांची मागणी .

बलात्काराच्या  घटनाच्या  विरोधात मानवत येथे कँडल मार्च.

आरोपिंना फाशीच्या शिक्षा करण्यांची  मागणी .

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१८: जम्मु काश्मीर येथील कठुवा येथे आठ वर्षीय लहान मुलीवर सतत आठ दिवस बलात्कार करुन त्याला ठार मारण्यात आले तसेच उनावा उत्तर प्रदेश  येथील बलात्कार प्रकरणी देश हादरुन गेला आहे यासाठी निषेध नोदविण्यासाठी  मानवत येथे दि.१७ एप्रिल रोजी पेठमोहल्ला येथुन राञी ८ वाजता कँडल मार्च युवकाच्या वतीने काढण्यात आले .हा मोर्चा पेठमोहल्ला येथुन कडतन गल्ली मार्ग मेनरोडावरुन  होत पोलीस स्टेशन मानवत पर्यत पायी मार्च करण्यात आले युवकांनी हातात निषेध करणारे फलक हातात घेऊन मार्चमध्ये सामील झाले होते.या मोर्चात सर्वच जाती धर्मातील तसेच राजकिय पक्षानी सहभाग नोदवला. हा कँडल मार्च पोलीस स्टेशन येथे पोहचल्यानंतर याचे रुपांतर सभेत झाले यावेळी सय्यद समीर,नगरसेवक सय्यद जमील,नगरसेवक आनंद मामा भदर्गे ,हाफेज लतीफ यांनी आपले मनोगत व्यक्त करीत आरोपीवर कठोरावर कठोर कारवाई करत त्यांना फाशीच्या शिक्षाची मागणी केली.या कँडल मार्चमध्ये गजानन बारहाते,विजय खरात,शेख समीर,ईरफान खान,महेबुब पिंजारी,सय्यद मुजीब,शेख शफीक,अशफाक कुरेशी ,कलीम खान,हाजी रफीक कुरेशी ,मतीन बेलदार,असद खान,अमोल कदम ,मुस्ताक अल्लारंखा ,रज्जाक बेलदार यांच्यासह मोठ्याप्रमाणात युवक या कँडल मार्चमध्ये  सहभागी झाले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें