पोलीस ठाण्यासमोरील अतिक्रमण भिंत व ओटा तुटनार ? - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 18 अप्रैल 2018

पोलीस ठाण्यासमोरील अतिक्रमण भिंत व ओटा तुटनार ?

पोलीस ठाण्यासमोरील अतिक्रमण भिंत व ओटा तुटनार ?

जिंतूर/पठाण अजमत:
     जिंतूर पोलिस ठाण्यासमोरील नगर परिषदेच्या जागेवर अतिक्रमण करून पोलिसांनी एक भिंत व वोटा बांधला असून हे अतिक्रमण पाडण्यातयावे या मांगणीसाठी नगरसेवक उस्मानखान यांनी आज आक्रमक भूमिका घेत पालीकेच्या सर्वसाधारण सभेत मुख्याधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले .नंतर सभेत चर्चा झाल्यावर सदरील अतिक्रमण काढण्यासाठी ठराव पारीत करण्यात आला.
          या बाबत माहिती अशी की जिंतूर पोलीस ठाण्यासमोरील नगरपरिषदेच्या त्या जागेवर अतिक्रमण करून फळ विक्रेते हे आपआपले हातगाडे लावून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गेल्या जुन महिन्यात पोलिसांनी नगरपरिषदेला हाताशी धरून हे अतिक्रमण काढून हातगाडेवाल्यांना या जागेवरून हाकलून लावून पोलीस प्रशासनाने स्वतः अतीक्रमण केले .पर्यायी जागेची मागणी वारंवार करून जागा उपलब्ध होत नसल्याने हातगाडे वाल्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवून पोलिसांनी या जागेवर अतिक्रमण करून भिंत व एक ओटयाचे बांधकाम केले. याकडे वेळीच लक्ष पालिकेने देउन पालीकेने हे अतिक्रमण होणे थांबायला पाहिजे होते पण पुर्वीपासूनच पोलीस व पालिका मुख्याधिकारी जयवंत सोनवने यांनी मिली भगत असल्याने पालीकेने याकडे जानुन बूजून लक्ष न दिले. हे  अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी नगरसेवक उस्मानखान यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले पण याची  काहीच दखल घेत नाही म्हणून आज सर्वसाधारण सभेत आक्रमक भुमिका उस्मानखान यांनी घेतली.
पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी मुस्लीम समाजाला लक्ष केले असून मुख्याधिकारी जयवंत सोनवने हे त्यांना पूर्ण  सहकार्य करत असल्याचा आरोप उस्मानखान यांनी सभेत आपली बाजू मांडतांना केला.सदरील अतिक्रमण काढण्यासाठी ठराव पारीत तर झाला पण ठरावावर पालीका प्रशासन कधी अमलबजावणी करेल किती वाट पाहवी लागणार या कडे लक्ष वेधले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें