सव्वा लाख ग्रंथ संकलीत करणार.
स्वा.रा.ती.म.वि.नांदेडच्या डॉ.बाबासहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचा उपक्रम.
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१०एप्रिल २०१८आगामी भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिना निमित्त नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यास केंद्रास सव्वा लाख ग्रंथ जमा करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ग्रंथरूपी अभिवादन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमास देशभरातून ग्रंथ प्राप्त होतील अशी आशा आहे. गंगाखेड तालुक्यातुन ग्रंथ संकलनाची जबाबदारी प्रा. डॉ. संतोष हंकारे, सोनपेठ तालूक्यातुन प्रा.सखाराम कदम व ग्रंथपाल राजेश खेडकर यांच्याकडे तर परभणी जिल्ह्याची जबाबदारी प्रा. डॉ. आनंद इंजेगांवकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
वाचन संस्कृती जपन्यासाठी व जोपासन्या साठी समाजातील सर्व ग्रंथप्रेमी नागरीकांनी व बांधवांनी ग्रंथदान करून योगदान द्यावे अशी विनंती एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासाठी प्रा.डॉ.संतोष हंकारे- गंगाखेड 9421489487 व 7972831323
सोनपेठ- प्रा.सखाराम कदम 9975380004 ग्रंथपाल राजेश खेडकर 9975374654
प्रा.डॉ.आनंद इंजेगांवकर (लोकाशा नगर, जिंतूर रोड परभणी) 9790363670 या भ्रमनध्वनीवर संपर्क साधन्याचे आवाहन ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठ च्यावतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें