दुचाकीच्या समोरासमोर धडकेत बाप लेक ठार. दोघांची प्रकृती गंभीर. धामणगाव नजीक घडला आपघात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 10 अप्रैल 2018

दुचाकीच्या समोरासमोर धडकेत बाप लेक ठार. दोघांची प्रकृती गंभीर. धामणगाव नजीक घडला आपघात.

दुचाकीच्या समोरासमोर धडकेत बाप लेक ठार.


दोघांची प्रकृती गंभीर.


धामणगाव नजीक घडला आपघात.
घटनास्थळ


सेलू (प्रतिनिधी)( समशेर खान)  सेलू -पाथरी रस्त्यावर दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने या आपघातात चौघे जण गंभीर जखमी झाले त्या पैकी  मदनराव गिराम व मुक्तीराम गिराम या बाप लेकांचा  उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर दोघांची  प्रकृती गंभीर आहे हि घटना ९ एप्रिल रोजी दुपारी ५:३०  घडली आहे.
                   याबाबत ची  माहिती अशी की एम एच २२ एल६८४० व एम एच २३ पी.९७५०  हिरो होंडा फॅशन ह्या दोन भरधाव वेगाने चालणार्या दुचाकीची  समोरासमोर ९ एप्रील रोजी दुपारी ५:३० वा सुमारास धामणगाव नजिक धडक झाली .या  अपघातात  पाथरीहुन सेलू कडे येत असणारे  कवनधन (ता सेलू ) येथील आन्ना काबंळे (वय २८) आशोक रूपाजी थोरात (वय ४०) ह्या दोन जखमींवर  सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तर  डासाळा येथील मुक्तिराम मदन गिराम ( वय २८) व  मदनराव गणपतराव  गिराम (वय 60)
डासाळा(ता.सेलू) यांना  सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतू मदनराव गिराम यांचा सेलू येथे  उपचादरम्यान  मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा मुक्तीराम मदन गिराम याला परभणी येथील जिल्हा रूग्णालयात नेत आसतांना कोल्हा पाटिवर त्याची प्राणज्योत मालवली .
    दरम्यान घटनास्थळावरून  जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करणेसाठी  धामणगाव येथील उदय डख, गोविंद मातने ,नारायण गरड, बालासाहेब डख ,रतन डख , यांनी पुढाकार घेतला.

गिराम कुटुंबीयावर काळाची झडप                                सेलू तालुक्यातील डासाळा येथील गिराम कुटुंबातील बाप व मुलगा यांच्यावर काळाने झडप घातली त्यांच्या निधनाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली ग्रामस्थांनी सेलू उप जिल्हारूग्णालयाकडे धाव घेतली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें