सेलु येथील जयश्री सोन्नेकर यांचा सत्कार - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 10 अप्रैल 2018

सेलु येथील जयश्री सोन्नेकर यांचा सत्कार

सेलु येथील  जयश्री सोन्नेकर यांचा सत्कार.

समशेर खान.
सेलू : येथील श्री केशवराज  बाबासाहेब  विद्यालयातील मराठी विषयाच्या सहशिक्षिका जयश्री सोन्नेकर यांना रविवार ( दि.८ ) रोजी नांदेड येथे डॉ.वृषाली किन्हाळकर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत १३ वर्षापासून सामाजिक सेवेत कार्यरत असलेल्या  सौ.गंगुताई साले प्रतिष्ठान,नांदेडच्यावतीने आई स्मृती प्रित्यर्थ आई शिर्षक पुरस्कार साहित्य,सुञसंचालन व आईचे कर्तव्य निभावल्याबद्दल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्या बद्दल गटसाधन केंद्रात दहावी पुर्नरचीत अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षण समारोप कार्यक्रमात विषयतज्ञ सुनीता तळोकर यांच्या हस्ते जयश्री सोन्नेकर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी साधन व्यक्ती रघुनाथ सोन्नेकर,बळीराम हिरे,प्रशिक्षणार्थी शिक्षक संतोष पाटील,सुरेखा आगळे,पुष्पा पवार,जोगदंड उपस्थित होते. सुञसंचालन व आभार प्रदर्शन सुरेश हिवाळे यांनी केले.
सेलू  : येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील सहशिक्षका जयश्री सोन्नेकर यांचा आई पुरस्कार मिळाल्या बद्दल  सत्कार करतांना सुनीता तळोकर,रघुनाथ सोन्नेकर,बळीराम हिरे,सुरेश हिवाळे,पुष्पा पवार,सुरेखा आगळे ,जोगदंड.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें