तेज़्ज़न्युज़ 24 दुपार च्या हेडलाईन
🌟पिंपरी : डोक्यात गोळी झाडून अभियंत्याची आत्महत्या.
🌟अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील भाग्यश्री फंड आणि धनश्री फंड महाराष्ट्र राज्याच्या "बेटी बचाव,बेटी पढाओ" अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसिडर.
🌟सोलापूर : भाजप सरकारविरोधात काँग्रेसचा मोर्चा, 'मोदीजी का देखो खेल, महँगा सिलेंडर, महँगा तेल', घोषणाबाजी सुरू.
🌟भिवंडी : गुंदवली ग्रामपंचायत हद्दीतील ऑईल गोदामाला लागलेल्या भीषण आगीत श्री गणेश कंपाऊंडमधील 12 ते 15 गोदामं जळून खाक. 10 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण.
🌟औरंगाबाद : माणिक रुग्णालयाला मोठी आग, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट.
🌟सोलापूर : पंढरपुरात आज वडार समाजातर्फे मूक मोर्चा. भादुले चौकातून थोड्या वेळात मोर्चाला होणार सुरुवात. स्टेशन रोड परिसरातील दुकाने बंद.
🌟पुणे : कोयत्याने वार करुन दोघांच्या हत्येचा प्रयत्न, सातारा रोडवरील धनकवडे पेट्रोल पंपावरील घटना.
🌟राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडे घालत केली सुरुवात.
🌟देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, वर्षभरात पेट्रोलमध्ये 9 तर डिझेलमध्ये 7 रुपयांची वाढ.
🌟यवतमाळ : शेतात अोलित करताना विजेच्या धक्क्यामुळे शेतक-याचा मृत्यू. मृत शेतक-याचे नाव राजू जुनघरे (40 वर्ष).
🌟उस्मानाबाद- सतरा वर्षीय तरुणीची छेड काढल्याचं प्रकरण. तरूणीच्या आई-वडिलांना आठ जणांकडून मारहाण. छेडछाडीचा जाब विचारल्याने मारहाण.
🌟ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांची प्रकृती अधिक खालावल्याची माहिती.
🌟भिवंडी - भिवंडीमधील गोदामाला लागलेली आग सहा तासानंतरही कायम, अश्निशमन दलाकडून आग शमवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें