पक्ष्यांसाठी २१ पाण्याचे भांडे,व दाण्यासाठी टोपल्याची व्यवस्था... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 5 अप्रैल 2018

पक्ष्यांसाठी २१ पाण्याचे भांडे,व दाण्यासाठी टोपल्याची व्यवस्था...

पक्ष्यांसाठी २१ पाण्याचे भांडे,व दाण्यासाठी टोपल्याची व्यवस्था...


  भोकरदन तालुक्यातील मनापुर येथिल संजय दळवी यांचा ६ वर्षापासुन उपक्रम..



 भोकरदन  प्रतिनिधी :(शेख सलीम)


   सध्या भर उन्हाळ्याचे दिवस असुन सकाळपासुनच उन्हाचा तडाखा सुरू होत आहे,या उन्हाने अंगाची अक्षरशा लाही लाही होत आहे.दुपारी तर रस्ते माणसाविना निर्ममणुष्य होत आहे.पशु पक्षांना ही सावलीच्या आधार शोधत आहे.एवड्या कडाक्याच्या उन्हात माणुस थंडगार पाणी मिळावे म्हणुन तात्काळ प्रयत्न करतो त्याला ते मिळते ही पण पशु पक्षाचे काय हाल होत आहे याकडे कोणाचेही लक्ष नाही.

  पण भोकरदन तालुक्यातील मनापुर येथिल संजय हनुमंत दळवी या शेतकर्यांनी रानावनात भिरभिर फिरनार्या पक्षासाठी आपण काही करावे अशी चिंता मनात नेहमीच सतवत होती.व त्यांनी ठरवले की पक्षांना भर उन्हाळ्यात मार्च ,एप्रिल ,मै महिण्यात दाना पाण्याची सोय करायची व दळवी यांनी फेब्रुवारी महिण्यापासुनच पाण्यासाठी भांडे व खाण्यासाठी टोपल्याची व्यवस्था करण्याचे काम हाती घेतले व काही दिवसातच हे भांडे तयार केल्यानंतर मार्च महिण्याच्या सुरवातीला मनापुर गावासह भोकरदन पोलिस स्टेशला व पोलिस काॅलनीत २१ पाण्याची भांडे व खाण्यासाठी टोपल्यांची व्यवस्था केली व लिंबाच्या सावलीच्या झाडांना व्यवस्थीत बांधुन पिण्यासाठी थंडगार पाणी व खाण्यासाठी ज्वारी ,बाजरी,तांदुळ,भरडुन टाकण्याचा उपक्रम सुरू केली आहे,गेल्या सहा वर्षापासुन दळवी यांचा हा उपक्रम चालु असुन मागील वर्षी गावात व वाड्या वस्तीवर १०१ पाण्याच्या कुंड्या व धान्यासाठी भांडे लावले होते.त्यांच्या या  उपक्रमाचा मनापुर सह पंचक्रोशीत चांगलीच चर्चा होत असुन गावातुनही या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

  सध्याच्या धकाधकीच्या जीवनात स्वत: पलिकडे न पाहाणारा जमाना आहे पण या जमाण्यात संजय दळवी सारखे पक्षीप्रेमी असल्याने संसाराचा गाडा हकलत असतांना मुक्या जिवांचीही काळजी पाहात असल्याचे दिसुन येत आहे.
मनापुर येथे ६ वर्षापासुन मी हा उपक्रम घेत आहे.आम्ही काही वर्षापुर्वी औरंगाबादला असतांनी तिथेही आमच्या परिवारांच्या मदतीने पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था व गायींना हि घरासमोर पाण्याची व्यवस्था केली होती.मनापुर गावात व वाड्यावस्तींवर एकुण १०१ पाण्याची भांडी लटकवली असुन भोकरदन पोलिस स्टेशमध्ये व पोलिस काॅलनीमध्ये २१ कुंड्या लावल्या असुन, पशु पक्षी याठिकाणी पाणी व दाने खाण्यासाठी रोज येतील.


संजय हनुमंत दळवी : पक्षप्रेमी मनापुर

 संजय दळवी यांनी जो पक्षांसाठी दानापाण्याचा उपक्रम हाती घेतलाय तो खरच कौतुकास्पद असुन,सर्वांनीच दळवी यांची प्रेरना घेऊन उन्हाळ्यात पक्षांसाठी दानापाण्याची व्यवस्था करावी..


  दशरत चौधरी : पोलिस निरिक्षक भोकरदन



  फोटो ओळी : भोकरदन पोलिस  ठाण्यात पाण्याच्या कुंड्या देतांनी पक्षप्रेमी संजय दळवी सोबत पोलिस निरिक्षक दशरत चौधरी,पोलिस उपनिरिक्ष ज्ञानेश्वर साखळे,नारायण लोखंडे,अभिषक दळवी,रामेश्वर दळवी,प्रविण मिरकर,संजय कचके,सतिष राठी सह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.


  भोकरदन येथिल पोलिस काॅलनीत संजय दळवी यांनी महिलांना पक्षांसाठी एक -एक किलोचे दान्य वाटप करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें