भोकरदन SBI शाखाचे अधिकाऱ्याचे तुग्लकि कारभार ग्राहकाला धक्के मारुन हकलुन दिले.
शे.सलिम.प्रतिनिधी.भोकरदन.
भोकरदन येथील एस.बी.आय. शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल दि. 09/03/18 ला एका खातेदाराला धक्के मारुन हाकलून दिले एवढेच नव्हे तर त्या खातेदाराला आई वरुन शिव्या पण दिल्या. त्यामुळे एसबीआय खातेदारांमध्ये तीव्र नाराजी चे वातावरण पसरले आहे, या अगोदर सुद्धा बँकेचे मॅनेजर यांनी एका खातेदाराला शिव्या देवून हाकलून लावले होते, त्या अगोदर कॅशियर मंडळीने सुद्धा दहा रुपयेचे नाणे घेण्यास नाकार दिला होता आणि फार गोंधळ घालून खातेदाराला त्रास दिला होता, अश्या प्रकारे बँकेचे अधिकार्यांची आणि कर्मचाऱ्यांची दररोज ग्राहकांसोबत किरकिर असते त्यामुळे बँकेचे खातेदारांमध्ये फार मोठी नाराजीचे वातावरण पसरले आहे, दररोज किरकोळ कारणावरून बँकवाले खातेदारांवर संताप काढतात, चांगली वागणूक, नीट बोलणे, योग्य समाधान करणे, सोयीचे मार्गदर्शन करणे, खरी वाट दाखवणे, हे सर्व करायला ह्या कामचुकार अधिकार्यांना व कर्मचार्यांना जिवावर येतो त्या मुळे अशी फजिती दररोज होते, अता शासन द्वारे व एसबीआय चे मुख्य कार्यालय द्वारे आणि महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग व ग्राहक मंच, ह्यांनी मिळवून भोकरदन एस.बी.आय शाखेचे अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या मुसक्या बांधले पाहिजे, एवढिच एक मात्र मागणी ग्राहक मंडळी करत आहे,

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें