स्पर्धा परीक्षा पुर्वतयारी परीक्षेचे यशस्वी आयोजन
सोनपेठ(राजेश खेडकर)येथिल कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या करिअर अँड कौन्सिलिंग सेलच्या वतीने दि. १० मार्च रोजी स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने पुर्वतयारी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात स्पर्धा परिक्षेच्या बाबतीत वर्षभर विद्यार्थ्यांना करिअर अँड कौन्सिलिंग सेलच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले होते. या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस स्पर्धा परिक्षेच्या धर्तीवर पुर्वतयारी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परिक्षेसाठी ७४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांनी आज ही परीक्षा दिली. यावेळी हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम यांनी परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली. या परिक्षेसाठी प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर अँड कौन्सिलिंग सेलचे समन्वयक प्रा. डॉ. कल्याण गोलेकर, प्रा. डॉ. अंबादास बर्वे, प्रा. डॉ. बळीराम शिंदे, प्रा. डॉ. संतोष रणखांब क्रीडा समन्वयक प्रा. गोविंद वाकणकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. परीक्षा यशस्वीपणे पार पाडली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें