तालुकास्तरीय नवोदय सराव परीक्षेस प्रतिसाद
साने गुरुजी कथामाला चिकलठाणा बु शाखेचा उपक्रम
समशेर खान.सेलू (प्रतिनीधी)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेचे स्वरूप समजावे व त्यांच्या आभ्यासाचे मुल्यमापन त्यानां लक्षात यावे यासाठी चिकलठाणा बु.येथील सानेगुरूजी कथामालेच्या वतीने ११ मार्च रोजी घेतलेल्या नवोदत्र सराव परीक्षेस चांगला प्रतिसाद मिळाला.
येथील गट साधन केंद्रात ११ मार्च रोजी सकाळी १० वा. अखील भारतीय मराठी पत्रकार संघाचे सचिव रेवणअप्पा साळेगांवकर यांचे हस्ते साने गुरूजींच्या प्रतिमेचे पुजन करून नवोदय सराव परीक्षेचा शुभारंभ केला यावेळी केंद्र संचालक मधुकर काष्टे , नखाते आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शाम मचाले ,रायपुर जि.प.चे मुख्याध्यापक कैलास सोळंके ,वालुर कन्या शाळेतील.शिक्षक सदानंद देशमाने यांची उपस्थीती होती.
यावेळी तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील १७५ विद्यार्थ्यांनी हि नवोदय सराव परीक्षा दिली .यासाठी ९ परीक्षा हाँल वापरण्यात आले होते.
या सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेचे स्वरूप लक्षात आले.यानंतर तालुका स्तरावर दुसरी सराव परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय मुख्याध्यापक तथा संयोजक मधुकर काष्टे यांनी दिली चिकलठाणा बु केंद्रांतर्गत चार सराव परीक्षा घेतल्या असुन गट शिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरावर हि सराव परीक्षा घेण्यात येत आहे .या परीक्षेत १० विद्यार्थ्यांची निवड केली जणार असुन विद्यार्थी व पालक यांचा सत्कार केला जाईल असे त्यांनी सांगीतले
या परीक्षेसाठी आर बी होलसुरे,एस.व्हि रासवे ,पि.डी.कुलकर्णी, बि एस बाबर यांनी परीश्रम घेतले .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें