सेलूत गणगौर निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 22 मार्च 2018

सेलूत गणगौर निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

सेलूत गणगौर निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम


◾राजस्थानी महिला मंडळाचा उपक्रम 

समशेर खान.
सेलू :- येथे राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने गणगौर निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

शहरात राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी गणगौर निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी 16 मार्चपासून कार्यक्रमाची सुरवात झाली सर्व प्रथम गणगौरचे गाणे घेण्यात आले व नंतर नोंक झोंक ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत सासू, सुन, ननंद, भावजई यांचे दैनंदिन जिवनात होणारे वादविवाद सादर करण्यात आले. 17 मार्च रोजी विविध फळांपासून ज्वेलरी दागिने बनवन्याची स्पर्धा घेण्यात आली यामध्ये महिलानी आपल्या कल्पकतेतून विविध प्रकारचे दागिने तयार केले. 18 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता शहरातून गणगौरची मिरवणूक काढण्यात आली यात महिलांचा मोठा उत्साह दिसून आला. यावेळी गणगौरच्या गाण्यावर महिलांनी पारंपारिक नृत्याचे सादरीकरण केले. 19 मार्च रोजी सकाळी गणगौरचे लग्न लावण्यात आले मंगळाष्टक गाऊण शहरातून बालाजी मंदिरापासून मोंढ्यातील रोकडीया हनुमान मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला मंडळाची मोठी उपस्थिती होती. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें