सेलुत पेट्रोल पंप चालकांकडुन ग्राहकांची फसवणुक - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 22 मार्च 2018

सेलुत पेट्रोल पंप चालकांकडुन ग्राहकांची फसवणुक

सेलुत पेट्रोल पंप चालकांकडुन ग्राहकांची फसवणुक

समशेर खान.
सेलू प्रतिनिधी -
सेलू शहरात सध्या पेट्रोल पंप चालकांकडुन नजर चुकवून पेट्रोल मिटर सेट न करता पेट्रोल टाकून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे.
सेलु शहरातील रेल्वे स्टेशन जवळील सर्वात जूना व नावाजलेला सि.टी .पारीख यांच्या पेट्रोल पंपावरील पेट्रोल पंप कर्मचा-यांना कडून ग्राहकांना अशी फसवणूकीची व ऊध्दटपणाची वागणूक मिळत आहे.मिटर सेट न करणे, सुटे पैसे करीता आडवणुक, गाड्यांची रांग असताना त्यांना थाबवुन बाटलीत पेट्रोल भरुन देणे या तक्रारी मुळे ग्राहकांचे खटके वारंवार उडत असतात. बुधवार ता. २१ रोजी परमेश्वर रोडगे मोटरसायकल घेवून पंपावर पेट्रोल टाकण्याकरीता गेले पंपावर  अनेक मोटरसायकल ची लाईन होती.त्यांचा नंबर आला तेंव्हा तिनशे रुपयांचे पेट्रोल टाकण्याचे सांगितले असता तेथील कर्मचारी दिलीप काष्टे याने गर्दीचा फायदा घेत मिटर सेट न करता तसेच पेट्रोल टाकले. फसवणूक लक्षात आल्यावर जाब विचारला असता ऊध्दटपणाची व अरेरावीची भाषा केली त्यावेळी त्यांनी तक्रार रजिस्टर केली व तहसील मार्फत पंचनामा केला असता मोटरसायकल मध्ये कमी पेट्रोल आढळून आले. जनतेची राजरोसपणे फसवणूक करण्या पेट्रोल पंपावर कारवाई  व्हायला पाहिजे अशी  मागणी जनतेतून होत आहै.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें