मानवत तालुक्यातील मानोली येथे मोबाईल बँटरी चार्जीग करत असताना स्फोट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 22 मार्च 2018

मानवत तालुक्यातील मानोली येथे मोबाईल बँटरी चार्जीग करत असताना स्फोट.

मानवत तालुक्यातील मानोली येथे मोबाईल बँटरी चार्जीग करत असताना स्फोट.


मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.२२. मानवत तालुक्यातील मानोली येथील सोमेश्वर अनंतराव तळेकर वय १७  हा युवक आपल्या राहत्या घरी  मोबाईल ची बँटरी  खेकडा चार्जीग ला लावुन चार्जीग करत  असताना मोबाईल चा स्फोट होऊन यात ह्या युवकाच्या हातास गंभीर दुखापत झाल्याची घटना  दि.२२ मार्चरोजी दुपारी एक वाजता मानोली येथे घडली.
या विषयी अधिक माहिती अशी की, सोमेश्वर अनंतराव तळेकर  ११ वित शिकणारा के.के.एम.कॉलेजचा विद्यार्थि हा युवक आपल्या घरात  मोबाईल ची बँटरी खेकडा चार्जीग ला लावुन बँटरी चार्जीग करत असताना अचानकपणे मोठा स्फोट होउन या युवकाच्या हाताला व बोटाला गंभीर दुखापत झाली यामुळे त्याला मानवत येथील डॉ.दगडु यांच्या खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणले होते यावेळी परभणी येथील  डॉ .के एस महाघडे व
डॉ .पाचलेगावकर यांनी युवकाच्या बोटाची शस्त्रक्रिया केली  डॉकटरांनी अधिक उपचार करुन युवकाचे उजव्या हाताचे  तीन बोटाचे कांडे अॉपरेशन करुन काढण्यात आले आहे व सध्या युवकाची तब्येत बरी असुन डॉ.दगडु यांच्या दवाखान्यात त्याचे उपचार सुरु आहे.

2 टिप्‍पणियां: