तरुण पिढीने आधुनिक शेती कडे वळणे आवश्यक आहे - नामदार बबनराव लोणीकर
समशेर खान.विशेष.प्रतिनिधी.
काळाची गरज लक्षात घेऊन आधुनिक शेती साठी तरुण पिढीतील शेतकऱ्यांनी पुढे यावे असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वछता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बबनराव लोणीकर यांनी जळगाव येथे जैन इरिगेशन समूहाच्या वतीने आयोजित पदमश्री डॉ अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उचच तंत्र पुरस्कार वितरण सोहळ्यात केले या प्रसंगी माजी मुख्यमंत्री श्री शरद पवार, मा ना श्री चंद्रकांत पाटील,ना मा श्री पांडुरंग फुंडकर,मा ना श्री गिरिश महाजन,मा ना श्री चंद्रशेखर बावनकुळे,श्री गुलाबराव पाटील,श्री एकनाथ खडसे,श्री सुरेश जैन,खा रक्षा खडसे,श्री उन्मेष पाटील,श्री संजय सावकारे,कवी ना धो महानोर आदी उपस्थित होते
यावेळी नामदार लोणीकर म्हणाले कि,संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीमुळे जैन इरिगेशनने कृषिक्षेत्रात केलेले कार्य मोलाचे व अद्वितीय आहे. भारतातील ठिबक सिंचन उत्पादक आणि शेतीतील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स आहे त्यांच्यामुळेच दुष्काळ भागात पाण्याच्या काटेकोर तंत्रज्ञान आज सर्वांना माहित झाले आहे शेती माल भावाच्या वस्तुस्थिती बाबत श्री लोणीकरांनी मार्मिक पाने त्यांच्या शेतात पिकविलेल्या पपईचा किस्स्सा सांगितला स्वतः १.५० किलो विकलेली पपई १२ रु किलो ने मार्केटमध्ये मिळत होती मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेती मालावर प्रक्रिया करण्यासाठी परतूर तालुक्यातील आष्टी येथे रुरुबनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालकीची मिनी एमआयडीसी उभारण्यात येत असल्याचे सांगितले
यावेळी मा शरद पवार यांच्याविषयी बोलताना नामदार लोणीकर म्हणाले कि, पवार साहेबांची इछाशक्ती शक्ती दांडगी असून त्या जोरावच त्यांनी कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर मात करून यमाला हुलकावणी दिली आहे स्वछतेचे जसे अमिताभ बच्चन ब्रँड अम्बॅसिडर आहे तसेच शेतकऱ्यांचे ब्रँड अम्बॅसिडर मा शरद पवार आहेत भारतासारख्या देशात शेतीचे महत्व कधीही कमी होणार नाही त्यामुळे शेतीमध्ये जास्तीत जास्त संशोधन व तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें