करमाड येथे भिषण अपघात,सदैवाने जिवित हानी टळली.
(करमाड :ता- औरंगाबाद )
प्रतिनिधी.इमरान खान १९/०३/२०१८
औरंगाबाद जालना महामार्गावर करमाड येथे आज बाजाराच्या दिवशी सकाळी 11.30 ,च्या सुमारास औरंगाबाद हुन जालन्याच्या दिशेला जाणारे अंदाजे 50 फूट टेलरने MH 43 Y 2265 ( ओपन ट्रकने ) डाव्या बाजूला असलेल्या ट्रॅक्टरला सर्वात अगोदर धडक दिली. व नंतर अंदाजे 50 फूट ट्रॅक्टरला फरपटत नेले त्याठिकाणी बाजार असल्याने कापशी खरेदिचा मांडलेला काटा, एक रासवंती, टरबूज विक्रेता, कापशी घेऊन आलेले तीन छोटा हत्ती सारखे वाहने, 6 ते 8 दुचाकी यांना सुद्धा ट्रकने फरपटत नेले, यापघातात कापूस विक्रीसाठी आणलेले टोणगाव येथिल शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते. त्याठिकाणी रसवंती टरबुज विक्रेते असल्याने अपघात क्षेत्रात अंदाजे 30 ते 35 नागरिक उपस्थित होते. परंतु ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर झालेल्या आवाजाने व 50 फूट ट्रेकटरला फरपटत नेल्याचे आवाजाने काही नागरिकांनी पळ काढला असावा. त्यामुळे अपघात क्षेत्रात उपस्थित असलेल्या जवळपास 10 नागरिकांना छोट्या छोट्या इजा झाल्या व 13 ते 17 नागरिक झखमी झाले, त्यात 3 जणांची प्रकृती अधिक गंभरी असल्याची माहिती करमाड पोलीस ठाण्यामार्फ़त मिळाली आहे. अपघात ग्रस्थाना धूत हॉस्पिटलमध्ये व औरंगाबाद येथे घाटी मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें