सोनपेठ तहसील कार्यालयात ग्राहक संरक्षण दिन साजरा
+ग्राहकांचे हित साधण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला-जिवराज डापकर
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१९मार्च २०१८
सोनपेठ तहसील कार्यालयात ग्राहक संरक्षण दिन साजरा करण्यात आला यावेळी नागरिकांना चांगली सेवा दिल्या बद्दल न.प.सोनपेठ व भुमी अभिलेख कार्यालय विभाग प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक सोपान शिरसाट, पत्रकार शिवमल्हार वाघे, राधेश्याम वर्मा हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी तहसीलदार जिवराज डापकर हे होते.
यावेळी सुधीर बिंदु, राजेश खेडकर, शिवमल्हार वाघे व पो.नि.सोपान सिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप जिवराज डापकर यांनी केला यावेळी बोलतांना त्यांनी ग्राहकांचे हित साधण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला असल्याचे सांगून, ग्राहकानेही याबाबत जागरूक असायला हवे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नारायण पिंपळे यांनी केले तर प्रास्ताविक अशोक साळवे यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें