जिल्हा परीषदेत भावनाताई नखाते यांच्या राजकारणाला समाजकारणाची मोहर
वर्षेपुर्तीचे विशेषवृत
सेलू (समशेर )
जिल्हा परीषदेत शिक्षण व आरोग्य विभागासह उपाध्यक्ष पदा्रील कामावर पुर्णपणे लक्ष केंद्रीत करून सर्वांना सोबत घेऊन विकासकामासह सर्वसामान्यांना न्याय देत सौ भावनाताई नखाते यांनी आपल्या राजकारणाला समाजकारणाची मोहर उमटवली हि बाब त्यांच्या वर्षपुर्तीमधून आधोरेखीत होते.
जि.प.उपाध्यक्ष पदासाठी कुठलेही आरक्षण नसतांना २१ फेब्रुवारी २०१७ रोजी सौ.भावनाताई नखाते यांची बिनविरोध निवड झाली .त्यानंतर शिक्षण व आरोग्य सभापती ची जबाबदारी आली .आज २१ फेब्रुवारी२०१८ रोजी एक वर्ष पुर्ण होत आहे
या एक वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला असता दररोज एक शाळा ,एक आरोग्य केंद्राला भेट देणे व दुपारी ३ते ७ वेळेत जिल्हा परीषद मध्ये थांबून समस्या निराकरण करणे व अभ्यासपुर्वक प्रश्नाची सोडवणूक करणे हि त्यांची कार्यपद्धती उल्लेखनीय ठरली.
पदाची सुत्र हाती घेताच बदल हवा असेल तर काही तरी केल पाहीजे हा मंत्र सौ.भावना नखाते यांनी शिक्षण व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना देऊन एका वर्षात कमालीची सुधारणा घडवून आणली . शाळेत मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी वाचन क्षमता हा १०० दिवसाचा विशेष उपक्रम सुरू केला त्याचबरोबर आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातच महिलांची प्रसूती झाली पाहिजे हा त्यांचा प्रयत्न महिलांवर्गासाठी आशादायी आहे.
आरोग्य सेवा हि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी सौ नखाते यांची धडपड सुरू आहे . ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा वर्कर यांना खुल्या प्रवर्गातील महिलांच्या मदतीबाबत जिल्हा परिषदेच्या शेषफंडातून मानधन देण्याबाबत आरोग्य समितीच्या बैठकीत विशेष ठराव घेऊन सौ.नखाते यांनी केलेले प्रयत्न विशेष म्हणावे लागतील .
तसेच अस्मिता योजनेअंतर्गत कार्ड व सेनिटरी नँपकिन्स चा लाभ खाजगी शाळेतील मुलींना व्हावा यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांचे कडे त्यांचा पाठपुरावा चालू आहे. तर शिक्षण विभागातील ५५१ रिक्त पदाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तसेच ९प्राथमिक आरोग्य केंद्र व ४६उपकेंद्राचा ब्रहत आराखडा मंजुरीसाठी सौ नखाते प्रयत्नशील आहेत .सभागृहातील व्यासपीठावर त्यांचे कुशल प्रभावी नेतृत्वावरून त्यांच्या कामाची चुणूक निश्चितच लक्षात येते.
जिल्हा परिषद अंतर्गत विशेष लक्ष देऊन दुर्धर आजाराच्या व्यक्तींना प्रत्येकी दहा हजार रूपयांची मदत दिल़ी.तसैच हादगांव बु येथील चंदा ढाले या मुलीचे अकस्मीक निधन झाले तिला विमा कंपनी कडचन १लक्ष रूपये मिळवून दिले.
सौ भावना अनिलराव नखाते यांनी वर्षे भरात सुंदर व्यवस्थापन व क्रियाशिल कौशल्याने आपल्या राजकारणाला समाजकारणाची मोहर उमटवली असेच म्हणावे लागेल .
कारवाई पेक्षा कार्यवाही ला प्राधान्य.....
घरातील घरपण जपणारे वातावरणात व मनातील समाजसेवेची ईच्छा यामुळे सौ भावना नखाते यांनी अनेक शाळा व दवाखाना भेटीतील उणीवां संदर्भात कारवाई पेक्षा त्या उणीवां कमी करणेसाठी कार्यवाही ला प्राधान्य दिले .त्यांनी जवळपास चारशे शाळांना भेटी देऊन विस हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाहणीत त्यांनी औषधी साठ्यावर विशेष लक्ष दिले.विशेष बाब म्हणजे कानसूर ,राधेधामणगांव ,खेर्डा येथे उद्भवलेल्या साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मेहनत त्यांनी घेतली.
वरीष्ठ स्तरावर मांडली भुमिका ..
प्रशासनातील अनुभव व विकासात्मक व्हिजन साठी सौ भावना नखाते यांनी वरीष्ठ स्तरावर कुशलतेने भुमिका मांडली यामध्ये मुंबई ,म्हाळगी सभागृह भाईंदर येथे सात राज्यातील शिक्षण सभापती ची कार्यशाळा, कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस चे चिंतन शिबीर ,मुंबईत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांची विशेष बैठक ,नांदेड येथे ७३व्या व ७४व्या घटनादुरूस्तीस २५वर्ष पुर्ण झाल्याबद्दल लोकशाही व सुशासन याविषयावर विभागीय परीषदेत सौ भावना नखाते यांनी महत्वपुर्ण भुमीका मांडली .
तर जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ दिपक सावंत ,शिक्षणमंत्री विनोद तावडे ,पालकमंत्री गुलाबराव पाटील ,पंचायतराज समितीचे आध्यक्ष आ.सुधीर पारवे ,शिक्षण प्रधान सचिव नंदकुमार ,विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांना निवेदन देऊन विनंती केली होती याची फलश्रुती म्हणजे १४ उपकेंद्रांना १८ वैद्यकिय अधिकारी मिळाले.९६आरोग्य उपकेंद्रांना सौरप्लँट ची उभारणी ,तिन उपकेंद्राच्या बांधकामासाठी १कोटी ८२ लाख ,१९उपकेंद्रांत धर्मशाळा व औषधी भांडारसाठी १ कोटी ५० लक्ष तर कौसडी प्रा.आ.केंद्रासाठी ३ कोटी ची तरतूद होय .
पक्षकार्य ही उल्लेखनीय
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा म्हणुन सौ भावनाताई नखाते यांचे पक्षातील योगदानही महत्त्वाचे ठरले सर्व तालुक्यात महिलांचे विशेष मिळावे त्याचबरोबर कॅडर कॅम्प ला मार्गदर्शन ,महिलांचा मूक मोर्चा ,इंधन महागाई संदर्भात मोर्चा ,इंधन दरवाढीच्या संदर्भात मोर्चा ,भारनियमनाच्या विरोधात कंदील मोर्चा ,शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हल्लाबोल मोर्चा या मधून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली .महिला जिल्हाध्यक्षा म्हणून त्यांचे पक्षात योगदान हे निश्चितच महत्त्वपूर्ण ठरले आहे.
पुरस्काराने सन्मान.....
सौ.भावनाताई नखाते यांच्या सामाजिक कार्याची विविध सामाजिक संस्थांनी दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले त्यामध्ये परभणी भुषण ,अहिल्यादेवी होळकर ,सावतामाळी बचतगटाचा पुरस्काराचा सामावेश होतो .हादगांव बु ग्राम पंचायतीचा स्वच्छता पुरस्काराने मुंबईत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हस्ते झालेला सन्मान हि विशेष बाब होय.
धार्मिक कार्यात सहभाग.......
प्रशासनात काम करत आसतांना सौ नखाते यांनी रत्नेश्वर रामपुरी येथे महाअभिषेक ,मानवत येथे गजानन मंदिरात प्रगटदिन ,हादगांव बु येथे दिवाळीनिमित्त ३२५ महिलांना साडी चोळीचे वाटप ,वरखेड येथे हनुमान मंदिरात अभिषेक व वनभोजन ,स्वामी समर्थ केंद्र पाथरी येथे दत्तजयंतीला पारायन ,मकरसंक्रांत निमित्त हाळदी कुंकू ,असे धार्मिक कार्यक्रम राबवून सामाजिक बांधीलकी जपली.
पती अनिलराव यांचे सहकार्यामुळे यशस्वी.....
माझे पती पाथरी कृउबास चे सभापती अनिलराव नखाते यांच्या सहकार्यामुळेच मला जि.प.चे पहिले उपाध्यक्ष माझे सासर माजी मंत्री कै स.गो नखाते यांच्या खुर्चीवर बसून प्रशासन चालविण्याची संधी मिळाली.
आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे ,आ मधुसूदन केंद्रे.यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.अध्यक्षा उज्वलाताई राठोड ,सर्व सभापती व सदस्य हे कुटुंबातील एकसंघपणे काम करतात याचा आनंद वाटतो.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें