जागतिक महिला दिना निमित्त शिबीराचे आयोजन
*महिलांनी अनन्यसाधारन असे स्थान निर्माण केले आहे-जहागिरदार
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२०मार्च २०१८महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई व कै.राजकुमार मव्हाळे ग्रामिण विकास सेवाभावी संस्था खडका यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोनपेठ येथे महिला व बालकल्याण कार्यक्रमांतर्गत एकदिवशीय कायदे माहिती विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला व बालकांविषयी असलेल्या कायद्यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांच्याप्रतिमेचे पुजन करुन झाली. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांनी केले.
श्रीमती बिडगर यांनी, सध्या टिव्ही, मोबाईलमुळे समाजातील वातावरण बिघडले आहे; त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांवर योग्य संस्कार घालून सुसंस्कारीत करावे असे वक्तव्य केले तर
मंगलाताई मुद्गलकर यांनी महिला व बालकांवरील अत्याचारासंबंधी कायद्यात असलेल्या तरतुदी व कलमांविषयीची माहिती दिली. बालाप्रसाद मुंदडा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा परभणी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
मुख्य मार्गदर्शक भाजपा ज्येष्ठ नेते रमाकांत जहागिरदार यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची शक्ती प्रत्येक महिलांत आहे म्हणुनच आज जगातील प्रत्येक देशाच्या अनेक महिलांनी स्वबळावर विविध क्षेत्रात सन्मानाचे अढळ स्थान निर्माण केले आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनपेठ नागरी सह. बँकेचे चेअरमन रमाकांत जहागिरदार हे होते तर, प्रमुख उपस्थिती मंगलाताई मुद्गलकर जिल्हाध्यक्षा जिल्हा म.मो.परभणी, ता.अ.भा.ज.प. महादेव गिरे, मल्लिकार्जुन सौंदळे तालुका सरचिटनिस सोनपेठ, जिंतुर विधानसभा विस्तारक सुशिल रेवडकर,
बिडगर मॅडम, बचाटे ताई, मिनाताई सावंत तालूका अध्यक्षा सोनपेठ म.मो.भाजपा, निर्मला चव्हण श.अ. सोनपेठ म.मो.भा.ज.पा, सोळंके मॅडम, बलवंतसिंग राठोड, चौधरी साहेब, कांबळे साहेब, व्यंकटराव कस्पटे, पवार साहेब, पत्रकार राधेश्याम वर्मा, राजेश्वर खेडकर, देवानंद सौंदळे आदींसह परिसरातील महिला, पुरुष व किशोरवयीन मुले व मुलींची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन विनोद देशपांडे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजीव गांधी बीसीए महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें