क्रांतीविरांना हुतात्मा दिनानिमित्त संस्था व वाचनालयाच्या वतीने अभिवादन
आजय बोराडे.वांगी बु.येथे जन सेवार्थ बहुउद्देशीय सेवा भावी संस्था व श्री गुरूमाऊली सार्वजनिक वाचनालयात भारतीय स्वतंञ्य लढ्यात स्वत:च्या प्राणाची आहुती देणारे क्रांतीवीर हुतात्मा भगतसिंग किशनसिंग संधु ,हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, हुतात्मा सुखदेव रामलाल थापर यांच्या ८७ व्या हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे व वाचनालयाचे अध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांनी केले होते.
यावेळी हुतात्मा क्रांतीविरांच्या प्रतीमेस ग्रामपंचात सदस्या ज्योती लक्ष्मण साळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्राम सेवक एल.आर.कोळी, पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, सोसायटी सदस्य सुरेश साळवे, ग्राम पंचायत सदस्या श्रीमती गंगुबाई काकडे, श्रीमती सरलाबाई साळवे, संस्थेच्या सचिव श्रीमती कविता गायकवाड, लक्ष्मण साळवे, अंबादास काकडे, पवन साळवे, नितीन जावळे, सचिन काकडे, सुजीत कुलकर्णी, परमेश्वर गायकवाड, सोपान गायकवाड, गाजानन साळवे नईम पठाण आदी गावकरी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें