सि. टी पारेख पेट्रोलपंपाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करा.
◆अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मागणी.
समशेर खान.सेलु(प्रतिनिधि) :शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील भारत पेट्रोलियम च्या सि. टी. पारेख पेट्रोल पंपावर बुधवार 21 रोजी ग्राहकाला कमी पेट्रोल टाकण्यात आले होते.परंतु पुरवठा प्रशासनाकडुन केवळ पंचनामा करण्यात आला कार्यवाही काहीच झाली नाही. यासह शहरातील इतर ही पंपावर पंपधारक मिटर सेट न करता पेट्रोल टाकून ग्राहकांची लुट करत असुन दोषी असणा-या या पंपधारकांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्याची मागणी अखील भारतीय ग्राहक पंचायतच्यावतिने करण्यात आली आहे. शुक्रवार 23 रोजी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या पेट्रोलपंपावर ग्राहक पेट्रोल भरण्यासाठी गेले असता मिटर शुन्य सेट न करता तसेच जेवढे पेट्रोल टाकावयास पाहिजे त्यापेक्षा कमी पेट्रोल टाकुन ग्राहकांची लुट करत आहेत. तसेच ग्राहकांनी विचारणा केली असता ग्राहकांशी वाद करत असतात. अनेक वेळा ग्राहकांना घाई असल्याने ते वाद न घालता निघुन जातात याचा फायदा हे पेट्रोलपंपावरील कर्मचारी घेत आहेत. ग्राहकांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पेट्रोल टाकणे पेट्रोल पंपधारकाना बंधनकारक असतांना हे तसे न करता नेहमीच कमी पेट्रोल टाकून ग्राहकांची लुट करत आहेत यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असे प्रकार टाऴण्यासाठी व ग्राहकांची लुट थांबविण्यासाठी दोषी अढळलेल्या या पंपावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाध्यक्ष डाँ. विलास मोरे, ता. सचिव शिवाजी आकात ,अशोक कोपुलवार, अश्विनी घोगरे आदींनी पुढाकार घेतला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें