मुस्लिमांची राजकीय वाटचाल काय ?
भारताला स्वातंत्र्य मिळुन सात दशकाचा काळ सुरु झाला तरी भारतीय मुस्लिम समाजास आज देखील आपले राष्ट्रीयत्व लोकांना पटवून द्यावे लागतेय . कारण हि त्याला तसच आहे यामागे एक विचारपूर्वक यंत्रना काम करत आहे व करत आली आहे .
कारण मुस्लिमांच्या हक्काविषयी बोलनारा एक जरी उभा राहिला तो नेता असो कि सामान्य नागरिक असो .त्याला पाकड्या 'लांड्या 'धर्मांधांदतेचा शिक्का कायम बसलेला ...
आज महाराष्ट्रांत किंवा देशात कॉँग्रेस असो किंवा भाजप असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो यांनी फक्त वोट बँक म्हणुन या समजाकडे पाहिल .
या समाजात कोणी नेता होऊ नये अशी भूमिका नेहमी मांडली .ताजच उदाहरण घ्या जिग्णेश मेवानी ला दलित नेता म्हणुन वर आणला हार्दिक पटेल ला पटेलाचा नेता म्हणुन पुढे आणला पण कोणी मुस्लिम नेता म्हणुन पुढे येत असेल तर नेहमी त्याच्यावर शिक्का बसलेलाच हे नक्की ?
आज ग्रामीण किंवा शहरी भागातील मुस्लिम समाजचे प्रश्न सोडा मुस्लिम बहुल भागातील साधा दफन भूमिचा प्रश्न सुटला नाही .
साधा पवार साहेबांच्या बारामती मधील कब्रस्तानचा प्रश्न मिटला नाही .
आज आमची मंडळी अल्पसंख्याक सेलच ; शहर अध्यक्ष अशी नाना पक्षाची फुटकळ ' पद मिरवत रमजान मध्ये इफ्तार पार्टीत टोप्या घालून वोट बँक मिळवून देत असतात .
आज कितीतरी गावे अशी सापडतील कि या गावात मुस्लिम वोट बँक असुन देखील 15 व्या वित्त आयोगातून एकही रुपयाचा निधी अज्ञानता मुळे व अंधारात ठेवल्यामुळे मिळाला नाही .जिल्हा परिषदेच्या निधितून आपणास काही येत नाही .फक्त आपण प्रचारक म्हणुन भुमिका पार पाडायची का ?
फक्त आम्हांला धर्मनिरपेक्ष राष्ट्र देशभक्ति या मुद्यावर एकाने आग लावायची दुसऱ्याने विझवायाची हेच पाहायाच का ?
मुस्लिम समाजात सामाजिक आर्थिक धार्मिक जागृती बरोबर राजकिय जागृती निर्माण होणे गरजेचे आहे .
आज सीरियाचा जो मुद्दा निर्माण झाला आहे जर मुस्लिम समाजातील लोकसख्येनुसार 45 खाजदार जर आज संसदेत असते तर आज ओवेसीप्रामणे आवाज उठवु शकले असते .एक राजकिय दबाव निर्माण झाला असता एवढच सांगायच आहे .
मुस्लिमसमाजाने आपले हक्क मागितले पाहिजेत .
लेखक=अनवर पठान.
मो.नं.8888375846

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें