जागतिक महिला दिना निमित्त इंगोले यांचा सत्कार - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 9 मार्च 2018

जागतिक महिला दिना निमित्त इंगोले यांचा सत्कार

जागतिक महिला दिना निमित्त इंगोले यांचा सत्कार

सोनपेठ(राजेश खेडकर)

येथिल नागरिकांच्या वतीने सामाजिक कार्यात सतत धडपड करत सर्व समाजाचे हित करणाऱ्या जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा शिवमती पुष्पाताई इंगोले यांचा सोनपेठमधील विविध क्षेत्रातील नागरिकांनी महिला दिनाच्या निमित्ताने सन्मान केला. यावेळी अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कराड होते, तर प्रमुख पाहूणे ग्रंथवाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर, वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह. भ. प. आश्रोबा महाराज खरात, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यातील सामाजिक कार्यात सतत प्रयत्न करणारे व समाज उपयोगी कार्य करणारे व्यक्तीमत्व म्हणून इंगोले दाम्पत्य सर्व परिचित आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कराड , ग्रंथवाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर, वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह. भ. प. आश्रोबा महाराज खरात, व्यावसायिक सोमेश्वर आंबेकर, प्रा. डॉ. मोरे, प्रा. संदिपकुमार देवराये, प्रा. डॉ. पुरुषोत्तम मोरे,  प्रा. डॉ. संतोष रणखांब, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार धबडे, मुख्याध्यापक अंकुश परांडे, बाजीराव, भागवत हाके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, गुलाब पुष्प व सावित्रीबाई फुले समग्र वाङ् मय हा ग्रंथ भेट देऊन शिवमती पुष्पाताई इंगोले यांच्या कार्याचा गौरव करुन सत्कार करण्यात आला. या सत्कारा बद्दल पुष्पाताई इंगोले यांनी सर्वांचे आभार मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें