11 मार्च रोजी उस्मानाबाद येथे होणार्या महीला मेळाव्याची तयारी पुर्ण
11 मार्च अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती मराठवाडा विभागाच्या वतीने उस्मानाबाद येथे भव्य महीला मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याच्या तयारी साठी विभागीय अध्यक्षा किरण ताई निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज उस्मानाबाद येथे बैठक संपन्न झाली.या बैठकीत उस्मानाबाद जिल्ह्यातील 12 महीलांचा सत्कार महीला मेळाव्यात करण्याचे ठरले.
मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून माया पानसे,जिल्हा उधोग केंद्राचे निरीक्षक पांडुरंग मोरे यांना बोलावण्याचे ठरले.
बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा,प्रदेश उपाध्यक्षा रेखाताई लोमटे,प्रदेश दारु विरोधी विभागाच्या अध्यक्षा लताताई आगळे,विभागीय अध्यक्ष सांस्कृतिक सतिश लोंढे,विभागीय सरचिटणीस गजानन देवडे,जिल्हा अध्यक्षा व्रन्दावणीताई गवळी,जिल्हा अध्यक्ष गणी मुलाणी उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें