पदोन्नतीमधुन ७३उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची निवड =शिक्षन सभापती नखाते. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 27 मार्च 2018

पदोन्नतीमधुन ७३उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची निवड =शिक्षन सभापती नखाते.

पदोन्नतीमधुन ७३उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची निवड            


४१ शिक्षक तर ३२ पदविधर शिक्षकांना मिळाली संधी 


शिक्षण सभापती सौ भावना नखाते यांची माहिती 


सेलू  (समशेर पठाण )
                                 परभणी जिल्ह्यातील ४१ प्राथमिक शिक्षक व ३२ प्राथमिक पदवीधर शिक्षक यांना सेवाज्येष्ठता नुसार  पदोन्नती देत त्यांची उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर निवड केली असुन यानिमित्ताने अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या ७३ शाळेत  कायम स्वरूपी उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची नियुक्ती झाली आहे अशी माहिती जि.प उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ भावना नखाते यांनी दिली .
            २७ मार्च रोजी जिल्हा परिषदेत कै बाबुराव गोरेगांवकर  सभागृहात जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी बि.पी पृथ्वीराज ,जि.प.उपाध्यक्षा. तथा शिक्षण सभापती सौ भावना अनिलराव नखाते ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही . करजखेडकर ,प्राथ शिक्षणाधिकारी आशा गरूड ,समाजकल्याण अधिकारी सरस्वती भोजने , उपशिक्षणाधिकारी नासेर पठाण यांच्या उपस्थितीत पदोन्नत्यांची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली .
         या पदोन्नत्ती मध्ये प्राथमिक शिक्षक ४१ तर  ३२ प्राथमिक पदविधर शिक्षक अशा ७३ शिक्षकांना उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर  पदोन्नत्या देण्यात आल्या. पदोन्नतीस पात्र शिक्षकांच्या शैक्षणिक व ईतर कागदपत्रांची पडताळणी ही यावेळी करण्यात आली.
                शिक्षक व पदवीधर शिक्षकांची डि एड् हि आवश्यक व्यवसायीक  पात्रता आसतांनाही पदोन्नती पासुन दुर रहावे लागत होते .सुधारीत नियमावलीनुसार प्राथमिक शिक्षक व पदविधर शिक्षक यांना सेवाज्येष्ठता नुसार उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली.पदविधर डि एड शिक्षकांचे मात्र नविन नियमावलीनुसार नशिब खुलले असेच म्हणावे लागेल.
        पदोन्नती प्रक्रिया मुळे ७३ शाळांच्या प्रशासनात निश्चित सुधारणा होणार आहे.
                     शिक्षण सभापती पदाचा कार्यभार सौ भावना नखाते यांनी घेतल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले तसेच शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासह  चटोपाध्याय प्रकरणे निकाली काढणे ,बिंदुनामावली व ईतर समस्या सोडविण्यासाठी सौ भावना नखाते यांचा  महत्त्वपुर्ण पुढाकार राहिला आहे .आज झालेल्या पदोन्नती प्रक्रियामध्येही त्यांचा पुढाकार महत्वाचा राहिला.
              या प्रक्रियेमुळे मागील अनेक  वर्षा पासून रखडलेल्या पदोन्नत्ती चे प्रकरणे निकाली निघाल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसुन आले

रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार ...                        ४१ प्राथमिक शिक्षकांना व ३२ पदवीधर शिक्षकांना उच्च श्रेणी  मुख्याध्यापक म्हणुन पदोन्नत्ती दिल्यामुळे ७३ जागा रिक्त होणार आहेत या रिक्त जागेसह ईतर ९०० रिक्त पदाचा अनुशेष हा नविन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी भरून काढण्यासाठी माझा प्रयत्न असेल असे शिक्षण सभापती सौ भावना अनिलराव  नखाते यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें