शालेय विकासासाठी समित्यांनी सक्षमपणे काम करणे गरजेचे. अशोक काकडे - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 27 मार्च 2018

शालेय विकासासाठी समित्यांनी सक्षमपणे काम करणे गरजेचे. अशोक काकडे

शालेय विकासासाठी समित्यांनी सक्षमपणे काम करणे गरजेचे. 

शैक्षणिक मेळाव्यात जि. प. सभापती काकडे यांचे प्रतिपादन

समशेर खान.
सेलु(प्रतिनिधि) :जि. प. शाळा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांनी सक्षमपणे काम करणे गरजेचे असुन यामुळे शाळेचा विकास होवु शकतो तसेच विद्यार्थी हा केंद्रबिंदु मानुन शिक्षकांनी आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जि. प. बांधकाम सभापती अशोक काकडे यांनी केले. ते सोमवार 26 मार्च रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालायाच्या वतिने गट साधन केंद्र येथे आयोजीत शाळा व्यवस्थापन समिती सदस्याचा शैक्षणिक मेळावा या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य राजेंद्र लहाने,नगराध्यक्ष विनोद बोराडे, गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवडे यांची उपस्थिती होती. पुढे बालतांना काकडे म्हणाले की, आपण धार्मिक कार्यक्रमात खुप खर्च करतो त्या कार्यक्रमात काटकसरीने खर्च करुन पैसा शिल्लक कसा राहिल यांचा विचार करावा व शिल्लक राहिलेला निधी शाळेच्या विकासासाठी खर्च करण्याचे अवाहन ही यावेळी त्यांनी केले.तसेेच पुढे बोलतांना त्यांनी सुद्धा शहरी भागात व ग्रामीण भागात काम करताना शिक्षकांची तारांबळ व त्यांच्या मनात शिक्षणा प्रती व विद्यार्थी यांचे भविष्य या बद्दल निष्ठा ठेवुन शिक्षक काम करत असल्याने समाधान व्यक्त केले.गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे यांनी आपल्या प्रस्ताविकातुन तालुक्यातील शैक्षणिक सुधारणा तसेच शासन स्तरावरुन शाळांना कमी प्रमाणात निजी येत असल्याने काम करतांना आडचणी येतात तर याठिकाणी कार्यरत असलेल्या शाळा व्यवस्थापन समित्यांनी पुढाकार घेवुन लोक वर्गणीतुन कामे करावी लागत असल्याने सध्या व्यवस्थापन समितीची जबाबदारी मोठी आसुन शालेय शैक्षणिक विकासासह, भौतिक सुधारणाही करणे गरजेचे आहे. यामुळे शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पहिल्यांदाच तालुकास्तरावर मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
  याप्रसंगी जि. प. प्रशाला पारडी शाळेतील कु .राधा शेळके , मनीषा राठोड व काजल राठोड,नेहा राठोड  महेश राठोड व शिवप्रसाद पवार तर राधे धामणगाव शाळेतील सचिन ठोके आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच जि. प. शाळेत लोकवर्गणीतुन सुधारणा करणा-या सदस्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
 त्यानंतर शैक्षणिक व सामाजिक विषयावर जि प प्रा शाळा कुंडी व बोरगाव शाळेंनी पथ नाट्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
  तर दुपार सत्रात प्रगत शैक्षणीक महाराष्ट्र,आर.टी.ई.2009व शाळा व्यवस्थापन समिती चे विध्यार्थी गुणवत्ता विकासातील भूमिका या  विषयावर परिसंवाद घेण्यात आला . या मध्ये मा.मधुकर काष्टे, युवराज माने ,तानाजी भोसले, कुलकर्णी , सबनीस , बबन राठोड, पालक सदस्य माउली राठोड,बाळासाहेब बुरकुंडे यांनी सहभाग घेतला.
 कार्यक्रमाचे सूत्र संचालन युवराज माने व नानासाहेब पवार यांनी केले तर आभार मधुकर काष्टे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटसाधन केंद्रातील कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.
चौकटीचा मजकूर...
शैक्षणिक विकासात जिल्हात प्रथमस्थानी राहण्यासाठी प्रयत्न करा

—राजेंद्र लहाने

प्रगत शैक्षणिक महाराष्र्ट या मेळाव्यातून सेलूच्या शैक्षणिक  गुणवतेत आणखीन भर पडणार आहे .मी सर्व शिक्षकाकडून अपेक्षा करतो की, त्यांनी येणाऱ्या काळात तालुका शैक्षणिक विकासात जिल्ह्यात प्रथम स्थानी राहण्यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न करा.या कामासाठी अाम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत असा विश्वास श्री.लहाने यांनी यावेळी दिला दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण काम करत आहात हे खूप अभिनंदनिय आहे .अनेक शिक्षक खूप धडपडतांना दिसतात त्यांचा मला सार्थ अभिमान वाटतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र लहाने यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना केले.
केंद्र प्रमुखाचे सत्कारात राजकारण ==!==सोमवार 26 रोजी गटसाधन केंद्र येथे आयोजीत शाळा व्यवस्थापन समिती सदस्याचा शैक्षणिक मेळावा कार्यक्रमात शाळेची लोकवर्गणीतुन सुधारणा करणा-या प्रतिनिधिचा सत्कार करण्यात आला परंतु मोरेगाव केंद्रांर्गत येत असलेल्या साळेगाव येथील प्रतिनिधिंचा सत्कार केला गेला नाही. या गावामध्ये लोकवर्गणीतुन शाळेला 2 गुंठे जागा मैदानासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधकाम, तार कुंपण, विंधन विहिरीतील मोटार व ई-लर्निग कक्षासाठी लोकवर्गणी सुमारे 2.50 लाख रुपये करुन शाळेची सुधारणा करण्यात आली परंतु केंद्र प्रमुख बन यांनी या सत्कारामध्ये राजकारण करत या प्रतिनीधींचा सत्कार केला नाही. सदस्यांनी या बाबत विचारणा केली असता केंद्रप्रमुख बन यांनी आरेरावीची भाषा वापरुण प्रतिनिधीचा अपमान केला असल्याने परत एकदा शैक्षणिक विभागातील केंद्रप्रमुख यांनी सत्कारात राजकारण केल्याची खंत साळेगाव येथील समितीचे सदस्य यांनी व्यक्त केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें