मसरत फातेमा आदर्श शिक्षक पुरस्काराने सम्मानित .
मानवत/ मुस्तखीम बेलदारदि.२७: महाराष्ट्र राज्य ऊर्दू शिक्षक संघटना व झैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेमध्ये २०१७-१८ मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल मानवत तालुक्यातील ताडबोरगांव येथील जि.प.उर्दु माध्यमांची प्राथमिक शिक्षीका सौ. मसरत फातेमा ईलियास अली खान यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने आज दि.२७ मार्चरोजी गालीबनगर परभणी येथे कार्यक्रमात सम्मानित करण्यात आले.विशेष म्हणजे पंचायतराज समितीच्या दौऱ्यामध्ये परभणी जिल्हयातील एकमेव शिक्षिका मसरत फातेमा यांच्या शैक्षणिक उत्कृष्ट कार्याची नोद समिती सदस्यांनी घेतली होती व तसा अभिप्राय नोदवहीत नोदला होता.मसरत फातेमा यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रत्येक बाबीमध्ये विशेष कार्य केले आहे.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन अॉल ईडिया पर्सनल लॉ चे सेक्रेटरी मौलाना उमरैन महफुज रहमानी,जेष्ठ समाजसेवक ईजि.सय्यद रशीद साहेब,झैन फाउंडेशन चे अध्यक्ष मो.गौस,उर्दु संघटनाचे मन्नान सर,युनुस सर उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें