मानवत ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक क्षयरोग दिवस साजरा .
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.२७: मानवत ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक क्षयरोग दिवसानिमित्त दि.२६ मार्चरोजी क्षयरोग दिवस साजरा करण्यात आला . यावेळी डॉ.वर्मा,डॉ.कलीम खान,पि.व्हि.सावंत यांनी वैज्ञानिक रॉबर्ट कोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या वेळी पि.व्ही.सावंत यांनी क्षयरोग बाबत माहिती देताना सागीतले की,संपुर्ण जगाच्या एकुण क्षयरोगीपैकी २५ टक्के रोगी भारतात आहेत टि.बी.ईडिया २०१७ च्या अहवालानुसार सन २०१५ मध्ये भारतात २.८ लाख रुग्ण यात दगावले आहे.क्षयरोगामुळे ३ मिनीटाला २ रुग्ण दगावतात मार्च २०१८ मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या एड टिव्ही समिट या जागतिक परिषदेमध्ये पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सन२०२५ पर्यत टिबीचे भारतातुन समुळ उच्चाटन करण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.तसेच एस.खरात यांनी यावेळी बोलताना म्हणाले की,औषधोपचार नियमित घेण्याचे फायदे व रुग्णाचा आहार कसा असावा तसेच औषधोपचार खंडित केल्यास रुग्णास एस डि आर होऊ शकतो या बद्दल माहिती दिली.यावेळी डॉ.कलीम खान यांनी मार्गदर्शन करताना संशयीत क्षयरोगी रुग्ण व तपासणी बद्दल सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस.गायकवाड मँडम ,सत्वधर सर,पोञदार सर,मरड सर आदिनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे आभार एस कदम यांनी मानले.यावेळी मोठ्याप्रमाणात नागरीक उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें