आम्हीअसे घडलो
*मा.तानाजी चव्हाण*
*संगणक अभियंता* ,
*Dayton, ohio, America*
*हातोला ते अमेरिका कार्यप्रवास*💐
आज 19 मार्च 2018 रोजी *,जि प प्रा शाळा पारडी*येथे *facebook friend* *तानाजी चव्हाण व सौ .चव्हाण*यांच्याशी दिलखुलास मुलाखतीचा रंगतदार कार्यक्रम झाला .
*पुष्प 1*💐
प्रथम *मा.माऊली राठोड* यांनी गावच्यावतीने *मा.तानाजी चव्हाण यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुछ व अशोक चेपटे व युवराज माने लिखित शैक्षणिक पुस्तक ज्ञानरचनावाद समजपूर्वक शिक्षण* भेट देऊन सत्कार करण्यात आला .तसेच *सौ चव्हाण* यांचा सुद्धा *कु.काजल व मनीषा राठोड* यांनी शाल श्रीफळ पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
*विचारपीठावर अध्यक्ष म्हणून ,मा.अमोल आढे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून राजू आढे, रावसाहेब लघें , माउली राठोड, शिवाजी लघें, अनिल लघें, मुख्याध्यापक कुरेशी सर आदी उपस्थित होते*
कर्यक्रमाचे प्रास्तविक, मंगेश नरशिंगकर यांनी केले .
*मा .माउली राठोड यांनी--- शाळेच्या विकासात्मक वाटचाली विषयी आपले मत मांडले .त्यांनी शाळेच्या व मुलांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव तत्पर असू असा विश्वास व्यक्त केला .**
*"बालपण हा आनंदमयी आठवणींचा अनमोल खजिना असतो.आपणही आपल्या सभोवतीच्या बालकांच्या आनंदात थोडी भर टाकण्याचे प्रयत्न करूयात व आनंदी आनंद घेऊयात असं शेवटी माउली राठोड म्हणाले*
*पुष्प 2*
*दिखुलास मुलाखत*
*कु.काजल व कु राधा* यांनी चव्हाण दाम्पत्याची दिलखुलास मुलाखत घेतली .
*राधा-* *"बालपण म्हणजे आयुष्याचा पहिला पाऊस"*
*आपल्या बालपणातीलआठवणींच्या पावसातआम्हाला भिजायला आम्हाला भिजायला नक्की आवडेल !*👍तेव्हा आपण आपल्या बाल्पनाविषयी आम्हाला थोडं सांगा.
*तानाजी चव्हाण*- बालपण हे खरंच खूप छान असतं.मला खूप आनंद वाटतो की, माझं बालपण खेड्यात गेलं .मी *जि प शाळा हातोला व महात्मा फुले विद्यालय हातोला येथे प्राथमिक शिक्षण घेतलं*
तुमचे शिक्षक *युवराज माने व मी एकाच शाळेत व एकाच वर्गात एकाच बेंचवर बसून शिकलोत आणि आज 20 वर्षांनी पुन्हा एकत्र तुमच्या मूळे आलोत काही क्षणापुरते का होईना*💐
*काजल*- *मा.चव्हाण सर आपण अभियंताच होण्याच का ठरवलं व हा प्रवास कसा झाला ?*
*तानाजी चव्हाण-*माझं दहावी च शिक्षण होण्यापूर्वीच *माझे मोठे बंधू अनिल हे डॉक्टर झाले, दुसरे बंधू सुनील हे विक्रीकर अधिकारी म्हणून मुंबईत रुजू झाले व माझी इच्छा म्हणण्यापेक्षा माझ्या वडिलांची खूप इच्छा होती व मग मी या शाखेचे शिक्षण घेतलं*व हे पूर्ण होण्यापूर्वीच अमेरिकेतील नामवंत कंपनीत मला बोलावणं आलं अन मग मी पुढील प्रवासास निघालो
*राधा-* चव्हाण ताई आपण ही आपल्या बालपण विषयी आम्हाला माहिती द्या.
*सौ ..चव्हाण*- *प्रथम आपल्या सर्वांचे अभिनंदन कारण आपण एवढ्या बालपणीच किती मोठी स्वप्न पहात आहात* माझे बालपण परभणी शहरात गेलं .माझे वडील ही इंग्लिश विषयाचे प्राध्यापक होते . *माझी एक बहीण जी सध्या दुबईत डॉक्टर आहे तीच माझी आदर्श आहे…* आज मी स्वतःची कपड्याची छोटी कम्पनी चालवते फक्त स्वतः ची कार्यक्षमता चालू ठेवण्यासाठी.
*काजल*- आपण अमेरिकेतील भोगोलिक व सामाजिक परिस्थितीविषयी माहिती द्यावी .
*तानाजी*- प्रथम सांगू इच्छितो की, भारताची संस्कृती ही खूप महान आहे .जरी भोगोलिक किंवा रस्ते, इमारती बांधल्या म्हणजे खूप काही नसतं . फक्त स्वछता ,शिस्त, कार्य करण्याची पध्दती आणि तेथील सिस्टम खूप छान आहे . ऋतुमान भारताप्रमाणेच, शेती तंत्रज्ञान प्रगत आहे .
*राधा*- अमेरीकेतील शाळा व शिक्षण विषयी सांगा .
*तानाजी*-भारतातील शिक्षण व अमेरिकेतील शिक्षण असा फरक करताना प्रथम सांगू इच्छितो की शिक्षण हे घेणाऱ्यांवर आहे .तेथील शाळा इमारती , रचना सुंदर आहेत, वेळेचे बंधन कुणालाच सांगावं नाही लागत कारण प्रत्येकजन सतर्क असतो.
आणि
*न्यायाधीश व शिक्षक ह्यांना खूप मोठा सन्मान दिला जातो , हे दोन्ही पद अमेरिकेत माननीय पद आहेत*
*राधा*-ताई , आपण अमेरिकेत गेल्यास काही अडचणी आल्या नाहीत का?
*चव्हाण ताई*- अडचणी म्हणजे *दिवस -रात्र* यातील फरक लक्षात येण्यास थोडा वेळ लागला वेळेतील तफावत होती ना !, बोली भाष्या, आहार, परिसर , आदी शी जुळवून घेणं जरा कठीण गेलं
*काजल-* सर तुम्हाला मग भारत देश्यात राहायला आवडत की अमेरिकेत?
*तानाजी-*स्वतः चा देश हाच सर्वांना प्रिय असतो.अमेरिकेत फक्त व्यवसाय म्हणून मी गेलोय ,पण माझं मन भारतातच रंमत.
*ज्या देशात आई वडिलांना भेटण्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागते तिथं कसं बरं मन रमू शकत, तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्ही सदैव आईवडील सोबत राहता नाहीतर अमेरिकेत मुलं मुली सुजाण झाली की त्यांना स्वतः कमाई करून स्वतंत्र रहावं लागतं*💐
असे अनेक प्रश्न राधाव काजल ने विचारले शिवाय प्रेक्षकातूनही अनेक प्रश्न घेत घेत जवळपास 2 तास सतत ही मुलाखत रंगतदार झाली .
*मधेच त्यांची मुलगी सई चव्हाण हिने अमेरिकन अभ्यासक्रमातील एक इंग्लिश कविता गायन करून मुलांना आनंदी केलं*
शेवटी *युवराज माने यांनी मुलाखतीचा सार मांडला कि,"चांगले शिक्षण हे केवळ श्रीमंतासाठी वा शहरी भागापुरते मर्यादित राहिल्याचे दिसून येते.म्हणूनच कानाकोपर्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहचविण्यासाठी जि प शाळांमधील उपक्रम वरदान ठरत आहेत यात शंका नाही हे आजच्या या मुलाखतीतून सिद्ध झाले आहे*💐💐💐💐💐💐
*💐सर्वच प्रश्न याठिकाणी लिखित स्वरूपात मांडणी करणं शक्य नाही . पण खूप सुंदर व ऊर्जादायी मुलाखत झाली हे मात्र खरं!👍*
शेवटी मा.काकडे सरांनी सर्वांचे आभार मानले .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें