महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी तर्फे अभिवादन
औरंगाबाद (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद तर्फे मराठवाड्याची तहान भागवीणाऱ्या जायकवाडी धरणाचे जनक तसेच संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त संमित्र कॉलनी मराठवाडा साहित्य परिषद कार्यालय येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडीया आणि ओबीसी विभागा तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओबीसी शहराध्यक्ष गजानन सोनवणे यांनी केले. स्व यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय जीवनाची माहिती मराठवाडा सोशल मीडीया चिटणीस जावेद खान यांनी दिली, याप्रसंगी ओबीसी जिल्हाध्यक्ष विलास ढंगारे, कार्याध्यक्ष संदीप घोड़के, गणेश आंबेकर, युवक कार्याध्यक्ष कय्यूम अहमद, ब्लॉक अध्यक्ष सलीम एस एस, तैय्यब शाहा, अमोल गवळे, अफरोज सय्यद, पूर्व चिटणीस अमित जगताप, अख्तर पटेल आदींची उपस्थिती होती सोशल मीडीया शहराध्यक्ष विलास मगरे यांनी आभार प्रदर्शन केले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें