दत्तात्रय दादाराव कादम यांची विद्यापीठ सिनेटच्या सदस्यपदी नियुक्ती
सोनपेठ(राजेश खेडकर)
सोनपेठ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष व परभणी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष दत्तात्रय कदम यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या स्वायत्त संस्था गटातून सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. विद्यापीठ कुलगुरुंच्या आदेशाने नुकतीच ही निवड करण्यात आली असुन; नियुक्तीचे पत्र नुकतेच कदम यांना आज प्राप्त झाले आहे.
विद्यापिठाच्या कार्यक्षेत्रातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या अनुभव व कार्यशैलीचा लाभ विद्यापिठास व्हावा यासाठी कुलगुरू अशा व्यक्तींना विद्यापीठ सिनेटच्या सदस्यपदी नियुक्त करतात. याच पद्धतीने दत्तात्रय कदम यांची नियुक्ती झाली आहे.
या निवडीबद्दल त्यांचे सोनपेठ न.प. नगराध्यक्ष, सभागृह गट नेते, विरोधीपक्ष गटनेते, सर्व सदस्य, मित्र परिवार तसेच शहरातून अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें