ए.पी.जे.अब्दुल कलाम उर्दु शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.१२: मानवत शहरातील खडकपुरा परिसरातील ए.पी.जे. अब्दुल कलाम उर्दु प्राथमिक शाळेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या हि वर्षि वार्षिक स्नेह सम्मेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि.११ मार्च रोजी राञी ८ वाजता टिपुसुलतान चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
या स्नेहसंम्मेलन व सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थिनी उत्कृष्ट असे देशभक्ती गीत तसेच नाटक,आजच्या समाजातील अनिष्ट रुढि परंपरा,हुंडाबळी या बाबत चे कार्यक्रम सादर करुन उपस्थीततांची मने जिकली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.सतीष बारहाते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन युवानेते डॉ.अंकुश लाड,हबीब बागवान ,न्यामत खान,नजायत खान,मो.मुस्ताक ,रफिक बागवान आदि उपस्थीत होते.या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुञसंचालन सलीम सर बागवान यांनी केले तर आभार प्रदषण तन्वीर सर यांनी मानले . या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठि शाळेचे मुख्याध्यापिका नौरसजहॉ मँडम , शमीम मँडम , रेशमा मँडम ,फरहिन मॕडम ,कौसर मँडम , तन्वीर सर , सलीम सर आदिनी परिश्रम घेतले.यावेळी पालकवर्ग मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें