मानोली येथील शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या.
+मानोलीता दोन महिण्यात तिसरी घटना
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२८:मानवत तालुक्यातील मानोली गावात शेतकऱ्यांचे आत्महत्या सञ चालूच असुन येथील शेतकरी श्री निवृत्ती लक्ष्मण मोरे या शेतकऱ्याने सतत च्या नापिकी व कर्जास कंटाळून व मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करण्याच्या आर्थिक विवंचनेतुन विष प्राशन करून आत्महत्या केली आहे मानोली गावात दोन महिण्यात हि तिसरी आत्महत्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
ही घटना बुधवारी दि.२८मार्च रोजी पहाटे साडे चार वाजता घडली. निवृत्ती मोरे या शेतकऱ्यांने सतत च्या नापिकी व कर्जास कंटाळून व मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करण्याच्या आर्थिक विवंचनेतुन आत्महत्या केली आहे.त्यांना मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. सकाळी ९ वाजता मानवत ग्रामीण रुग्णालय येथे त्याचे शवविच्छेदन करुन आज सकाळी ११ वाजता मानोली येथे त्याच्यांवर आतिमसंस्कार करण्यात आले.त्यांच्याकडे महेंद्रा फायनान्स चे दिड लाख रुपये व एस .बी .एच बँकेचे दिड लाख कर्ज झाले होते ते कसे फेडायचे या विवंचनेत ते नेहमी असायचे त्यातूनच ही आत्महत्या केली आहे. मोरे यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.या पूर्वी याच मानोलीत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वसिष्ठ शिदे यांनी आत्महत्या केली होती तसेच आमोल आशोक सुरवसे यांनी ९ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. निवृत्ती मोरे याच्या आत्महत्या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.मानोलीत २महीन्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची घटना घडली असुन शासनाने वेळीच शेतकऱ्यांचे प्रश्नाकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें