सिल्लोड येथे सोमवारी सत्यपाल महाराज यांची सत्यपालची सत्यवावाणी कार्यक्रमाचे आयोजन
आजय बोराडे.
सिल्लोड(प्रतिनिधी)कै.विश्वनाथ आप्पा क्षीरसागर यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमीत्त सप्तखंजेरी चे निर्माते राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक सत्यपालची सत्यवाणी या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी(दि.२६) रोजी सांयकाळी ७ वाजता केले आहे.
शहरातील ३६ एकर मैदान शिक्षक कॉलनी परीसरातील हनुमान मंदीरा समोर होणाऱ्या या किर्तनाच्या कार्यक्रमातुन सत्यपाल महाराज संत तुकाराम,फुले,शाहू,आंबेडकर,गाडगे बाबा,तुकडोजी महाराज यांच्या विचाराची समाजाला आज खऱ्या अर्थाने असलेली गरज ,देशातील शेतकरी बांधव कसा सुखी होईल,व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा जुन्या रूढी परंपरा,संघटन,स्त्री भ्रूण हत्या,शैक्षणिक विकास,स्वच्छ भारत अभियान,हागणदारी मुक्त ग्राम,पॉलिथीन बंदी,घनकचरा वर्गीकरण(ओला सुका),तरून तरुणीं चे निर्णय या विषयांवर ते जनजागृती करणार आहे.तरी या किर्तनाचा लाभ शहरातील नागरीकांसह सिल्लेाड-सोयगांव तालुक्यातील व परीसरातील भक्त गण व नागरीकांनी घ्यावा असे आवाहन प्रशांत क्षीरसागर व विशाल क्षीरसागर यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें