गंगाखेड येथे १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी
‘करियर मार्गदर्शन मेळावा’
गंगाखेड-
१०वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘करियर मार्गदर्शन मेळावा’ आयोजिण्यात आला असून या करियर मेळाव्यास लातूर येथील गोल्ड मेडलिस्ट श्री आर. एस. रेड्डी (एम.एससी.बी.एड.एम.फिल) गोल्ड मेडलिस्ट यांचे विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन लाभणार आहे, याचा लाभ विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक गोविंद चोरघडे आणि गंगाखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर इंगळे यांनी केले आहे.
ममता माध्यमिक विद्यालय आणि गंगाखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघांच्या संयुक्त विद्यमाने ‘करियर मार्गदर्शन मेळावा’मध्ये विद्यार्थ्यांनी १० वी आणि १२ वी मध्ये कशा प्रकारे आपला अभ्यास करावा त्याच बरोबर आपण कुठला अभ्यासक्रम निवडावा या संदर्भात मौलिक मार्गदर्शन लातूर येथील श्री. आर.एस. रेड्डी यांचे विद्यार्थ्यांना लाभणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ तथा ममता माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष गोविंदराव अळनुरे राहणार आहेत. न्यायाधिश श्री. किशोर मुंढे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. आत्माराम टेंगसे, प्रा. सौ. जयश्री पछाडे यांचे मार्गदर्शन होणार असून याचा लाभ विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी रविवार दि. २५ मार्च २०१८ रोजी सकाळी ठिक ९ वाजता मोठ्या संख्येने उपस्थितीने ममता माध्यमिक विद्यालय, बळीराजा कॉलनी, गंगाखेड येथे घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें