अस्मिता योजनेचा लाभ खाजगी शाळेतील मुलींना द्या
जि.प.उपाध्यक्षा भावना नखाते यांची ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांचे कडे मागणी
परभणी ( जिल्हाप्रतिनिधी )
अस्मिता योजनेअंतर्गत जिल्हापरिषद शाळेतील किशोरवयीन मुली पात्र आहेत परंतु खाजगी माध्यमाच्या शाळेतील किशोरवयीन मुली या लाभापासून वंचीत राहत आहेत त्यामुळे सदर परीपत्रकात सूधारणा करून खाजगी शाळेतील किशोरवयीन मुलींना ही लाभ द्यावा अशी मागणी जि.प.उपाध्यक्षा तथा शिक्षण ,आरोग्य सभापती सौ भावना नखाते यांनी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांचे कडे केली आहे .
ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळेतील ११ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छता व जनजागृतीबाबत ग्रामविकास मंत्रालयाय विभागाच्या वतीने १ मार्च १८ रोजी अस्मिता योजना जाहीर केली या योजनांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील मुलींना अस्मिता कार्ड व माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स दिले जाणार आहेत परंतु या योजनेपासून खाजगी माध्यमातील शाळेतील किशोरवयीन मुली वंचित राहत आहेत. त्यामुळे खाजगी माध्यमाच्या शाळेतील मुलींना ही या योजनेचा लाभ देण्यात यावा याबाबत ५ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण व आरोग्य सभापती सौ भावना अनिलराव नखाते यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांना निवेदन दिले आहे.
ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांनी १मार्च १८ रोजी ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परीषद शाळेतील ११ते १९ वयोगटातील मुलींना वैयक्तिक स्वच्छता व जनजागृतीबाबत अस्मिता योजने चे काढलेल्या परिपत्रकात बद्दल जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण व आरोग्य सभापती सौ भावना नखाते यांनी मंत्री मुंढेताईचे स्वागत केले आहे .
परंतु सदरील परिपत्रकाच्या अनुषंगाने ग्रामीण भागासह शहरी भागात मुलींची संख्या हि खाजगी माध्यमाच्या शाळेत मोठ्याप्रमाणात आहे.परभणी जिल्ह्यात ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींची संख्या हि जिल्हा परीषद शाळेत १९५९४ आहे तर खाजगी माध्यमाच्या अनुदानित शाळेत ५४८४३ व विनाअनुदानित शाळेत ८६३७ अशी एकुण ६३४८० किशोरवयीन मुलींची संख्या आहे
सदरील परिपत्रकानुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हा परीषद शाळेतील किशोरवयीन मुलींना लाभ देण्याबाबत मुलींची नोंदणी प्रक्रिया जिल्हा परीषद शाळेत सुरू झाली आहे.या योजनेअंतर्गत आस्मिता कार्ड व ८पँड चे एक पाँकीट मुलींना ५ रू या माफक दरात दिले जाणार आहे .१९५९४ मुलींना याचा लाभ मिळेल ही .
मात्र खाजगी माध्यमाच्या शाळेतील ६३४८० किशोरवयीन मुली या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत याबाबत गांभिर्यपुर्वक विचार करून १मार्च १८ च्या परिपत्रकामध्ये सुधारणा करून खाजगी शाळेतील मुलींना हि या आस्मिता योजनेचा योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी नखाते यांनी मुंढे यांचे कडे केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें