येवल्यात शेतकऱ्यांचा रुद्रावतार, बाजार समितीच्या कार्यालयला ठोकले ताळे, - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 5 मार्च 2018

येवल्यात शेतकऱ्यांचा रुद्रावतार, बाजार समितीच्या कार्यालयला ठोकले ताळे,

येवल्यात शेतकऱ्यांचा रुद्रावतार, बाजार समितीच्या कार्यालयला ठोकले ताळे,


*संचालक मंडळासहित सचिवाला कोंडले...*


*कांद्यात वांदा काढून शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्याला व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल.*


*तर बाजार समितीच्या सचिवाच्या  निलंबनाचे लेखी आश्वासन*



येवला दि. 5 मार्च 2018

येवला प्रतिनिधि ..
काझी सलीम

कांदा व्यापाऱ्याने शेतकऱ्याला उलटया होईपर्यंत केली मारहाण केल्याचे प्रकरण व्यापारी आणि बाजार समितीच्या चांगलेच अंगलट आले असून आज बाजार समितीच्या आवारात अनकुटे ता. येवला येथील शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, भारिप बहुजन महासंघ, मराठा सेवक संघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना आदींनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वाल्मिक गायकवाड या शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या बाळू सानप व  एकनाथ खेमचंद या व्यापाऱ्यावर कलम 326 अनवव्ये गुन्हे दाखल झाले आहेत.


व्यापाऱ्याच्या खळ्यात बेशुद्ध पडलेल्या शेतकऱ्याला उपचारासाठी पाठवण्याचे सौजन्य ही व्यापाऱ्यांनी न दाखवल्याने तालुक्यातील शेतकर्यांमध्ये प्रचंड रोष होता..

अनकुटे येथील शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या निषेध सभेसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते....

*बाजार समिती संचालक व सचिवांच्या आडमुठे पणा वाढला तणाव...*


बाजार समिती च्या आवारात शेतकरी तसेच जिल्ह्यातून आलेल्या विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी निषेध व्यक्त करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष हंसराज वडघुले , उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी सचिवांनी बाहेर येऊन मागण्यां संदर्भात चर्चा करावी अशी मागणी केली...मात्र सचिवांनी बाहेर येण्यास नकार दिला.

शेतकऱ्याला झालेला मारहाणीचा बाजार समितीशी संबध नाही अशी त्यांची भूमिका होती. संपूर्ण संचालक मंडळ सचिवांच्या केबीन मध्ये उपस्थित होते.

बाजार समिती चे संचालक संतू पाटील झांबरे यांची मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने शेतकरी आणखीच चिडले...

सचिव किंवा जेष्ठ संचालक आंदोलकांना सामोरे न गेल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार शेतकरी संघटनांच्या आंदोलकांनी   बाजार समिती कार्यालयाला ताळे ठोकले व सर्व संचालकांना कोंडून घेतले आणि पायऱ्यावर धरणे आंदोलन सुरू केले...

सुमारे तास भर मुर्दा बाद मुर्दा बाद - शेतकऱ्यांना मारहाण करणारे व्यापारी मुर्दा बाद ! ,व्यापाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या संचालक मंडळाचा धिक्कार असो, शेतकरी एकजुटी चा विजय असो अशा घोषणांनी बाजार समिती परिसर दणाणून गेला.

पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी आंदोलकांची समजूत काढत व्यापाऱ्यावर दखल पात्र गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन देऊन नव्याने तक्रारी दाखल करून घेतल्या...

बाजार समितीचे सचिव डी सी खैरणार यांना निलंबीत करावे अशी मागणी शेतकरयांनी लावून धरली.बाजार समितीचे संचालक शेतकऱ्यांची बाजू न घेता व्यापारी आणि सचिवांची बाजू घेतात त्यामुळे स्वाभिमानी चे हंसराज वडघुले यांनी थेट सहकार खात्याचे मुख्य सचिव जोगदंड यांना भ्रमण ध्वनी वरून येवला बाजार समिती चे सचिव खैरणार यांना निलंबित करण्याची मागणी केली..सहकार सचिवांनी जिल्हा निबंधकाना प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. बाजार समिती सचिव डी सी खैरणार यांच्या निलंबना चा प्रस्ताव 8 दिवसात सादर करू असे लेखी आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले...

या आंदोलनात, अनकुटे येथील सरपंच बाबासाहेब गायकवाड ,ऍड बापू गायकवाड, राजेंद्र गायकवाड,अनिल  गायकवाड,संतोष गायकवाड,विशाल  कुंभकर्ण,बाळू गायकवाड,योगेश सोनवणे,
दिगंबर बोंबले,अरुण गायकवाड,
भावराव सोमासे,ज्ञानेश्वर उगले
गणेश गायकवाड, योगेश गायकवाड, अनिल गायकवाड,

सुनील पवार, संजय पवार,
रामू गायकवाड,सोमनाथ गायकवाड,प्रकाश गायकवाड, संजय कोळगे, अंकुश गायकवाड, आप्पा गोरे, आप्पा गायकवाड,
कैलास गायकवाड, रवींद्र तळेकर, किशोर गायकवाड,कैलास सोनवणे
सोपान गायकवाड आदी सह तालुक्यातील शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप बहुजन महासंघ, किसान क्रांती मोर्चा, राष्ट्रसेवा दल,मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें