राज ठाकरेंच्या सभेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक, दुकानांची केली तोडफोड.
मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडली. काल झालेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष करताना ठाकरी शैलीत टीका केली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी देशातील सर्वच राजकीय पक्षांसमोर मोठे राजकीय आव्हान निर्माण केले आहे. मोदी-शाह या दुकली समोर टिकून राहायचे असेल तर परंपरागत वैर विसरून राजकीय दृष्ट्या एक होण्याचे वास्तव सर्वच राजकीय पक्षांनी स्वीकारायला सुरुवात केली आजे. वसई तालुक्याला महाराष्ट्रातून हद्दपार करून त्याचा गुजरात राज्यात समावेश करण्याचा प्रताप काही व्यावसायिकांनी केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात उजेडात आला होता. माध्यमांच्या वृत्तानुसार, राज ठाकरेंच्या शिवतिर्थावरील सभेनंतर रात्री उशीरा वसईतील पाच ते सहा दुकानांची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. दुकानांच्या पाट्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी काट्यांनी आणि लोखंडी रॉडने तोडून काढली. ही दुकाने गुजराती लोकांची होती असे वृत्त आहे. दुकानासोबतच गुजराती गाड्यांचीही तोडफोड केली आहे. वसई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. मुंबई-अहमदाबाद हायवेवरील घोडबंदर ते तलासरी दरम्यानच्या बहुतांश धाबे, दुकाने, हॉटेलांवर आता गुजराती पाट्या झळकू लागल्या आहेत. या पाट्यांवरून मराठीला तडीपार केल्याचे दिसत असतांना आता वसई तालुक्यातही गुजराती फलक झळकू लागले आहेत. इतकेच नाहीतर वसई तालुका महाराष्ट्रात नव्हे तर गुजरात मध्ये असल्याचे उघडपणे लिहिण्याचे धाडस गुजराती समाजाकडून केले जात होते. याचा मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या सभेनंतर खरपूस समाचार घेत तोडफोड केली आहे. वसईसह पालघर जिल्हयाचा गुजरात मध्ये समावेश करण्याचा कट शिजला जात असल्याचा आरोप मनसेने केला होता. याप्रकरणी खळळ खट्याक करण्यास आम्ही तयार आहोत, असा इशारा गेल्या आठवड्यात दिला होता.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें