मुलीसोबत छेडछाड करणाऱ्या युवकाचे लोकांनी केले हे हाल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 19 मार्च 2018

मुलीसोबत छेडछाड करणाऱ्या युवकाचे लोकांनी केले हे हाल.

मुलीसोबत छेडछाड करणाऱ्या युवकाचे लोकांनी केले हे हाल.

राजस्थानातील बूंदी जिल्ह्यातील अंगावर शहारे आणणारा एक व्हिडिओ पुढे आलाआहे. व्हिडिओ मध्ये लोकांचा घोळका एका युवकाला रश्शीने बांधून काठीने मारहाण करताना दिसत आहे. सांगितले जात आहे की हा व्हिडिओ रविवारी दुपारी शूट केलेला असून,व्हिडिओत मारहाण होत असलेला युवक हा एका मुलीसोबत गैरवर्तन करताना शेतात आढळला.

प्राप्त माहितीनुसार, गामछ रेल्वे फाटकाजवळ असलेल्या शेतात एक युवक मुलीसोबत गैरवर्तन करत असल्याचे तिच्या कुटुंबियांनी पाहिले. युवकाला तरूणीसोबतविचित्र आवस्थेत पाहून कुटुंबियांचा संताप चांगलाच अनावर झाला. त्यांनी युवकाला पकडले आणि रश्शीने त्याचे हात पाय बांधून काठीने मारहाण केली.

दरम्यान, झालेल्या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला कोटा येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण केशोरायपाटन पोलीस ठाणे परिसरातील गामछ गावात घडले. येथील शेतात काम करणाऱ्य़ा तरूणी सोबत आरोपी तरूणाने गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. तरूणी सोबत गैरवर्तन करताना युवकाला रंगेहात पकडल्याचा तरूणीच्या घरवाल्यांचा दावा आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केला. त्यामुळे युवकाची जीव वाचल्याची परिसरात चर्चा आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें