शेतकरी विरोधी सरकारला सभागृहात व सभागृहा बाहेर सळो की पळो करून सोडूपण शेतकर्यांना वाऱ्यावर सोडणार नाही....माजी मंञी आमदार राजेशभैय्या टोपे
बालानगर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या शाखेचे उद्घाटन..
शे.मुनाफआडुळ ता.१७ (बातमीदार) राज्यातील युती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे
राज्यातील अनेक शेतकरयांनी मृत्युला कवटाळले असुन जिवनावश्यक वस्तुंचे भाव
वाढल्याने व शेतीमालाचे भाव घसरल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापळला आहे.
केंद्रातील जुमलेबाज सरकारने विकासाचे स्वप्न दाखवुन नोट बंदी, जीएसटी
सारखे जनता विरोधी निर्णय घेवुन देशातील सर्वसामान्य जनतेला दशोधडीला
लावले अशी टिका राज्य व केंद्र सरकारवर माजी मंञी आमदार राजेशभैय्या टोपे
यांनी बालानगर ता. पैठण येथे केली. ते गुरुवार (ता.१५) रोजी येथे राष्ट्रवादी
युवक काँग्रेसच्या नविन शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात
बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, शेतकरी विरोधी सरकारला सभागृहात व
सभागृहा बाहेर सळो की पळो करून सोडू पण शेतकर्यांना वाऱ्यावर सोडणार
नाही. यावेळी राजेशभैय्या टोपे, संजय वाघचौरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक
शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर माजी आमदार संजय
वाघचौरे, विजय गोरे (तालुका अध्यक्ष ), भाऊसाहेब तरमळे (जिल्हा
उपाघ्यक्ष),ज्योती पठाडे (जिल्हाध्यक्ष युवती), गोपीनाना गोर्डे, अरुण काळे,
गोविंदतात्या शिंदे, नासेर शेख, अमोल तांबे, अरुण बोळले यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी माजी आमदार संजय वाघचौरे, ज्योती पठाडे यांनी आपल्या भाषणात
शिवसेना-भाजपा सरकारच्या निष्क्रिय धोरणाचा समाचार घेतला. तालुक्यातील
यावेळी शिवाकाका गोर्डे, वसंत गोर्डे, काकासाहेब गोर्डे, आसेफ शेख, हनुमान गोर्डे,
जाकीर शेख, अश्पाक शेख, परवेझ शेख, भागीनाथ तट्टु सह राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें