मानवत तालुक्यातील वांगी येथील वाळु धकक्यावर नियमबाह्य वाळु उपसा! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 21 मार्च 2018

मानवत तालुक्यातील वांगी येथील वाळु धकक्यावर नियमबाह्य वाळु उपसा!

मानवत तालुक्यातील वांगी येथील वाळु धकक्यावर नियमबाह्य वाळु उपसा!

[] अबब १३ दिवसातच ठेकेदाराने केले मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन []

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२१: मानवत तालुक्यातील गोदावरी नदिपाञातील  वांगी येथील वाळु धकक्याला अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी दि.२० मार्च रोजी अचानकपणे भेट दिली असता नदिपाञात शासनाच्या नियमाची पायमल्ली होत असल्याच्या संशयावरुन धकक्यावरील वाळु उपसा पुढिल आदेश येईपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते तसेच ई.टि.एस मशीनद्वारे तपासणी करण्याचे आदेश दिले होते . यात मानवत तहसिल कार्यालयाने कारवाई करत ई.टि.एस मशीनद्वारे तपासणी केली असता त्यात वाळु ठेकेदार यांनी शासनाने दिलेल्या वाळु उपसाच्या मर्यादेपेक्षा जास्त ब्रास वाळुचे उत्खनन केल्याचे आढळले आहे.
बार्शि येथील ठेकेदार अण्णासाहेब काजळे यांनी  दि.०७ मार्च २०१८ रोजी मानवत तालुक्यातील वांगी येथील वाळु धकक्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयातुन घेतली होती व त्याची अंतीम तारीख ३१ सप्टेंबर२०१८ पर्यत होती व त्यात एकुण ४५०० ब्रास वाळु उपसा करण्याचे आदेश असतानासुध्दा संबधित ठेकेदार यांनी २० मार्चपर्यत ५७९७ ब्रास येवढा वाळु अवैधरित्या  उपसा केला आहे . तहसिलदार नकुल वाघुंडे यांनी ई.टि.एस मशीनद्वारे तपासणी करण्याचे आदेश दिले होते यात तलाठी सिध्दार्थ बागुल,मंडळ अधिकारि एस.एस.जोशी व भुमिअभिलेखचे भुमापन अधिकारि कैरे यांनी ई.टि.एस मशीनद्वारे तपासणी केली असता यात १४ मार्चपर्यत २५३८ ब्रास वाळु उपसा करण्यात आली आहे व २० मार्चरोजी ई.टि.एस मशीनद्वारे तपासणी केली आसता ३२५९ ब्रास वाळु उपसा असे मिळुन १३ दिवसात ५७९७ ब्रास वाळु एकुण नदिपाञातुन  उपसा केला असल्याचे सिध्द झाले असुन दिलेल्या परवानगीच्या पुढे ठेकेदार यानी १३ दिवसातच जास्त वाळु उपसा केला असल्याने तहसिल कार्यालयाने  या संबधीचे अहवाल तयार करुन पुढिल कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवले जानार असुन पुढे या ठेकेदारावर काय कारवाई होते याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें