सेलूत झुलेलाल जयंती अभूतपूर्व उत्साहात
समशेर खान.सेलू :- आयोलाल झुलेलालच्या जयघोषात सोमवारी ता. 19 मार्च रोजी सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांची 1068 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्त प्रभात फेरी, शोभायात्रा यासह धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 6 वाजता सुरु झालेली मिरवणूक गुरूद्वारापासून स्टेशन रोड, नुतन रोड, मोंढा, गोविंदबाबा चौक मार्गे गुरूद्वारामध्ये महाप्रसादाने सांगता करण्यात आली. शहरात गेल्या 40 वर्षांपासून झुलेलाल जयंती साजरी करण्यात येते. जयंतीनिमित्त सकाळी ६ वाजता झुलेलाल भगवान यांची पंचामृत स्नान सोहळा पार पडला. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी सिंधी समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें