सिल्लोड येथील सह.दुय्यम निबंधक प्रकरणात शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनाला पुर्ण यश! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 21 मार्च 2018

सिल्लोड येथील सह.दुय्यम निबंधक प्रकरणात शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनाला पुर्ण यश!

सिल्लोड येथील सह.दुय्यम निबंधक प्रकरणात शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनाला पुर्ण यश! 

शेका पक्षाच्या मागण्या सह.जिल्हा निबंधकानी मंजूर केल्या.



शेख इस्माईल (सिल्लोड प्रतिनिधि)

सिल्लोड येथील सह दुय्यम कार्यालयातील सह दुय्यम निबंधकाच्या मनमानी कारभारा विरोधात तसेच बंद असलेल्या दस्त नोंदणी बाबत  शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तालुका चिटणीस भाई युनूस पठाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला यश प्राप्त आले असून बंद असलेल्या दस्त नोंदणी  सुरु करत असल्याचे आश्वासन सह. जिल्हा निबंधकानी आयोजित बैठकीत दिले.
   
     आज दि.20/03/2018 मंगळवार रोजी मुद्रांक जिल्हाधिकारी तथा.सह.जिल्हा निबंधक साहेबांच्या दालनात शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी जिल्हा चिटणीस भाई चंद्रकांत चव्हाण,सिल्लोड तालुका चिटणीस भाई युनूस पठाण, भाई शे.रफिक,भाई ताहेर पठाण , सह.दुय्यम निबंधक चकलावार यांची संयुक्त बैठक मुद्रांक जिल्हाधिकारी मा. जी.एस. कोळेकर साहेबांनी घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी मुद्रांक जिल्हाधिकारी तथा.सह.जिल्हा निबंधक साहेबांनी सह.दुय्यम निबंधकाची कानउघडणी करत तत्काळ दस्त नोंदणी सुरू करण्याचे आदेश(सुचना) दिल्या .
  गेल्या सहा महिन्यापासून सह दुय्यम निबंधक कार्यालयात प्लाॅट, सहाण जागा, बांधलेल्या घराचे खरेदीखत दस्त नोंदणी संबंधित सह दुय्यम निबंधकांनी बेकायदेशीर पणे बंद केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. नोंदणी अधिनियम कायद्याने सह दुय्यम निबंधकास दस्तांची वैधता तपासण्याचा अधिकार नसुन नोंदणी अधिकार्या समोर सादर झालेल्या दस्त व त्यासोबतचे कागदपत्रे खरे अथवा खोटे ठरवण्याचा अधिकार नाही. मालमत्ता विमियन 1886 कलम 135 व 36 अन्वये मालमत्तेची परस्परांनीच खात्री करणे आवश्यक आहे.
     असे नियम असतांना सुद्धा सह दुय्यम निबंधक विनाकारण नागरिकांना वेठीस धरत होते  "प्लाॅट सहानजागा इ.दस्ताची नोंदणीसाठी तहसीलदाराचे पत्र आणा, एन-ए 44 असलेल्या लेआउट नकाशावर नगर रचना विभागाचा आज तारखेतला सिक्का आणा " असे बेजबाबदार पणाचे फर्मान सह दुय्यम निबंधक नागरिकांना देत होते.
     या गैरव्यवहार विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने संबंधीत विभागाच्या वरिष्ठांना दि.5/03/2018 रोजी  लेखी तक्रार देऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलन सुध्दा सुरू करण्यात आले होते. शेका पक्षाचे 
मराठवाडा समन्वयक भाई डाॅ उमाकांत राठोड,जिल्हा चिटणीस भाई चंद्रकांत चव्हाण तालुका चिटणीस भाई युनूस पठाण, यांच्या नेतृत्वाखाली सह.जिल्हा निबंधक कार्यालयाला तसेच सह.दुय्यम निबंधक यांना घेराव आंदोलन तहसिल कार्यालय समोर महाधरणे आंदोलन  करण्यात आले होते. या प्रकरणाची दखल मा.मुद्रांक जिल्हाधिकारी तथा.सह.जिल्हा निबंधकांनी घेत आज दि.20/03/2018 मंगळवार रोजी त्याच्या दालनात बैठक आयोजित केली होती. आयोजित बैठकीत शेका पक्षाच्या पदाधिकारी  बरोबर चर्चा करत सह.जिल्हा निबंधकानी यापुढे सिल्लोड येथे दस्त नोंदणी कधीच बंद होणार नाही असे आश्वासन दिले व संबंधित अधिकारी यांना तशा सुचना ही दिल्या. दस्त नोंदणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.शेका पक्षाचे  आंदोलन यशस्वी झाले आहे. आंदोलन यशस्वी  करण्यासाठी शेका पक्षाचे नेते भाई युनूस पठाण,भाई  शे.रफिक भाई, भाई युसूफ प्रशाद, भाई ताहेर पठाण, युसूफ कादरी, तौफील देशमुख, भाई नाना साळवे, भाई  शेजुळ,सुरेश वाघ ,ताहेर पठाण, मुरलीधर हिरे, नाना पाढंरे, अशोक राका, तालेब भाई, शे.मुख्तार ,इरफान पठाण, शे. हकीम, जाकेर हाजी, शे. मियाँ, नईम पठाण, कृष्णा कथले, लडडु पटेल, मोइन मिस्तरी, नैनव पाटील, आरेफ पठाण, जहीर पठाण,मिर्झा सलीम बेग,अन्ना हावळे, गजानन  काळे, एकनाथ सुर्यवंशी,हुसैन शहा,पठाण शाकेर,शे.अकरम ,ताहेर मुल्ला,यांच्यासह आदीने परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें