ग्रंथदान करून वाढदिवस साजरा
दामोधर भोसले यांचा ऊपक्रम
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२३मार्च २०१८तालू्क्यातील मौ.खपाट पिंपरी येथील रहिवासी व स्वामी रामानंद तिर्थ ग्रामिण रुग्नालय व वैद्यकिय महाविद्यालय अंबाजोगाई येथे वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असलेले दामाेधर श्रीमंतराव भाेसले यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त मौ.खपाट पिंपरी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस ग्रंथदान केले. शाळेचे मुख्याध्यापक धोंडापुरे, सहशिक्षक सावंत, सहशिक्षीका श्रीमती पठाण यांनी ग्रंथभेट स्विकारली.
गावातील मुलांना पुस्तक वाचनाची आवड लागावी या उद्देशाने शाळेल पुस्तके भेट देत असल्याचे सांगुन वाचनाने विद्यार्थ्यांच्या शब्द संचयात वाढ होते असेही भोसले यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले. वाढदिवसा निमित्त तालूक्यातील ग्रामिण भागातुनही ग्रंथदान होत असल्या बद्दल समाधान व्यक्त करून सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्या सदस्यांनी दामोधरराव भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, ग्रंथदान केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
यावेळी गावचे सरपंच केशव बप्पा भोसले, उपसरपंच नवनाथ पवार, ग्रामस्थ अचुत माेरे, रमाकांत भोसले, उतम भाेसले, रामदास मस्के, उद्धव मस्के, दादा भोसले, दिपक मस्के, समाधान भोसले, नामदेव मोटे, सुनिल औताडे, माणिक माेरे, किशोर खंदारे आदींसह शाळेचे विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें