दोन मुलींना विष पाजून आईची आत्महत्या, अहमदनगर जिल्हयातील घटना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 23 मार्च 2018

दोन मुलींना विष पाजून आईची आत्महत्या, अहमदनगर जिल्हयातील घटना.

दोन मुलींना विष पाजून आईची आत्महत्या, अहमदनगर जिल्हयातील घटना.


कौटुंबिक वादातून एका महिलेने पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना विष पाजून स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड गावात गुरूवारी सांयकाळी हा प्रकार घडला. या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला असून दुसरी गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्यामल गणेश यरकळ (वय २८, रा. पिसोरेखांड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घरात झालेला वादाचा राग मनात धरून श्यामल यांनी हा प्रकार केला असल्याचे बोलले जात आहे. श्यामल यांनी तीन वर्षाच्या आराध्याला आणि दुसऱ्या मुलीला विष पाजले. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. गंभीर अवस्थेत असलेल्या दोन्ही मुलींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण आराध्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर दुसरी मुलगी अस्वस्थ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरू आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें