सोमेश्वर मंदिर येथे महारूद्र जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२०मार्च २०१८ ग्राम दैवत श्री सोमेश्वर मंदीर दहिखेड येथे प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी महरूद्र जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीराम कथा, सोहळा दि.२४ मार्च शनिवार रोजी प्रारंभ होत असुन सांगता दि. ३१ मार्च रोजी होणार आहे.श्रीराम कथेचे यजमान रामेश्वर मसुरे हे असुन कथा प्रवक्ते संगीत रामकथा प्रवक्ते रामायणाचार्य ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले हे आपल्या मधुर वाणीतुन कथा सांगणार आहेत. दैनंदिन कार्यक्रमात पहाटे काकडा आरती, विष्णु सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दु. १ ते ४ श्रीराम कथा ज्ञानयज्ञ, शिवलिला अम्रत, हरिपाठ, रात्रो ९ ते ११ नामवंत किर्तणकारांचे हरिकिर्तन होणार आहे.
या निमित्त शनिवारी ह.भ.प. गजानन महाराज देऊळगावकर, रविवार ह.भ.प. सच्चिदानंद महाराज काळे मरडसगांवकर, सोमवार ह.भ.प रामराव महाराज हेंडगे गुरूजी, मंगळवार किशोरीताई गिरी आळंदीकर, बुधवार ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, गुरूवार ह.भ.प. बाळु महाराज गिरगावकर, शुक्रवार ह.भ.प. आप्पा महाराज चौरे धारूरकर व शनिवार रोजी ह.भ.प.बापुसाहेब महाराज पंढरपुरकर यांचे सकाळी ११ ते १ काल्याचे किर्तन होणार आहे. सामुदायीक महाप्रसाद होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे. या धार्मीक कार्यक्रमाचा भावीक भक्तानी लाभ घ्यावा असे अवाहन समस्त गावकरी मंडळी दहिखेड, सोनपेठ यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें