त्या घटनेचा प्रेस क्लब च्या वतीने निषेध परभणीत जिल्यात झालेल्या पेपर फुटी प्रकरण
*जिंतूर / निशाद आहेमद*
इयत्ता दहावी च्या परीक्षेच्या पेपर फुटीची बातमी प्रकाशित केल्या प्रकरणी माध्यम प्रतिनिधी वर दाखल केलेलागुन्हा परत घेवून शिक्षण अधिकारयांवर कार्यवाही करावी अशी मागणी जिंतूर तालुका प्रेस क्लब च्या वतीने तहसीलदार जिंतूर यांच्या कडे करण्यात आली आहे
या संदर्भात 20 मार्च रोजतहसीलदार सुरेश शेजुळ याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक14 मार्च2018 रोजी 10वी च्या परीक्षेत विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल झाली अनेकांच्या मोबाईल वर तया प्रश्नपत्रिकेची कॉपी फिरली या संदर्भात पत्रकारांनी ही प्रश्नपत्रिका मोबाइलवर आल्याची खात्री केल्या नंतर तयात तथ्य आढळून आले सदरील माहिती मा., शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्याशी संपर्क साधून सांगितले त्या नंतर दिनांक15 मार्च रोजी दैनिक पुण्यनगरी, दैनिक लोकमत मध्ये या संदर्भात सविस्तर बातमी प्रसिद्ध झाली या संदर्भात शिक्षण विभागास पूर्ण माहिती देऊनही परभणी च्या शिक्षण विभागाने दैनिक लोकमत, पुण्यनगरी च्या जिल्हा प्रतिनिधी यांच्या विरुद्धविविध कलमा नुसारशहानिशा न करता बातमी प्रकाशित केल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात आला मा. शिक्षण विभागाने केलेला हा प्रकार म्हणजे याविभागात चाललेला गैरप्रकार माध्यमांनी उघडकीस आणू नये म्हणून प्रयत्न केल्याचे वाटत आहे
हेतू पुरस्करपने पत्रकारावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावें संबधीत अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिंतूर तालुका प्रेस क्लब च्या वतीने करण्यात येत आहेनिवेदनावर प्रेस क्लब चे स्वस्थापक विजय चोरडिया, तालुका अध्यक्ष मंचक देशमुख, कार्याध्यक्ष राहुल वाव्हळे, सचिव ज्ञानेश्वर रोकडे, गुलाबराव शिंदे, सय्यद मुसा, निशाद अहेमद, दिलीप देवकर,याआदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
फोटो:
परभणी जिल्हात पेपरफुटी प्रकरणात वर्तमान पञाच्या प्रतिनिधीवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी जिंतूर तहसीलदार यांना निवेदन देताना जिंतूर प्रेस क्लब सदस्य.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें