डॉ. पांडुरंग राठोड यांची भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 22 मार्च 2018

डॉ. पांडुरंग राठोड यांची भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

डॉ. पांडुरंग राठोड यांची भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड 

शेख मुनाफ पटेल
आडुळ ता. 22
तुळजाभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डाॅ.पांडुरंग राठोड यांची भारतीय जनता पार्टी  औरंगाबाद जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
भा.ज.पा.चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी केंद्रिय मंत्री खा.रावसाहेब पाटील दानवे  यांनी त्यांना  नियुक्ती पत्र देऊन पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी  हरीभाऊ बागडे
(विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य),बबनराव लोणीकर
(पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री),डाॅ.भागवतजी कराड
(उपाध्यक्ष भा.ज.पा महाराष्ट्र राज्य),भाऊराव देशमुख
(महामंत्री भा.ज.पा),प्रवीणजी घुगे(अध्यक्ष बाल हक्क आयोग),
विजयाताई रहाटकर
(अध्यक्षा महीला आयोग), रेखाताई कुलकर्णी,आमदार अतुल सावे,आमदार नारायण कुचे,आमदार संतोष दानवे ,  आमदार प्रशांत बंब,आमदार फड , आमदार किशनचंद तनवानी, एकनाथ जाधव
(जिल्हा अध्यक्ष ), बद्रीनारायण भुमरे(जिल्हा उपाध्यक्ष),विजय औताडे(उपमहापौर तथा भा ज यु मो चे जिल्हा अध्यक्ष),
पैठण तालुका अध्यक्ष तुषार पाटील शिसोदे ,
माजी उपमहापौर प्रमोद राठोड,
पैठणचे नगराध्यक्ष सुरज लोळगे,
फुलंब्री चे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ,राजु भांड,योगेश सोलाटे आदी मान्यवर उपस्थित होते . या निवडीचे सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत  करून डाॅ.पांडुरंग राठोड यांचे अभिनंदन केले आहे .
फोटो कॅप्शन 
औरंगाबाद येथील तापडिया नाट्यगृहात डॉ. पांडुरंग राठोड यांना नियुक्ती पत्र देतांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें