घारेगाव जिल्हा परिषद शाळेत आनंदनगरीचे आयोजन
शेख मुनाफ पटेल
आडूळ ता.22 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारेगाव (ता.पैठण)येथे बुधवार (ता.२१) रोजी आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले यावेळी
विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ घरून तयार करून दुकानदार बनुन विक्री
केले तर काही विद्यार्थ्यांनी ग्राहक बनून खरेदी करत बाजारातील खरेदी विक्रीचे
धडे घेतले. विशेष म्हणजे येथील अनेक विद्यार्थ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आणून
भाजीमंडीतला व्यवहार अनुभवला. काही विद्यार्थ्यांनी विविध खेळात सहभाग
नोंदवुन आनंद नगरीत उत्साह आणला. या आनंदनगरीचे उद्घाटन माजी सरपंच
रामेश्वर थोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच सोपान थोरे,
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंजाराम थोरे, रामकिसन थोरे, शाळेचे
मुख्याध्यापक जयवंत पांचाळ सह सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
घारेगाव ता. पैठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात
आलेल्या आनंदनगरीचे उद्घाटन करतांना माजी सरपंच रामेश्वर थोरे, माजी
उपसरपंच सोपान थोरे अदी.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें